Modi Appreciated Team India: आयसीसी टी-२० विश्वचषकातील सामन्यात रविवारी भारताने पाकिस्तानवर ४ विकेट्सनी चित्तथरारक विजय मिळवला. मेलबर्न येथे रंगलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात विराट कोहलीने ५३ चेंडूत ८२ धावा तडकावल्या. विराट कोहली याची ही अप्रतिम खेळी सर्वांच्या स्मरणात राहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विराट कोहलीचे कौतुक केले आहे. तसेच भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
Narendra Modi appreciated Team India : पंतप्रधान मोदींनीही केले कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून विराट कोहलीचे कौतुक (Narendra Modi appreciated Team India) केले आहे. पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले, ‘भारतीय संघाने चांगला संघर्ष करून विजय मिळवला! आजच्या सामन्यासंदर्भात विराट कोहलीचा विशेष उल्लेख करावा लागेल ज्याने उत्तम कामगिरी केली. विराट कोहलीने नेत्रदीपक कामगिरी करत उल्लेखनीय दृढता दाखवली. पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा.’
विराट आणि हार्दिकची शतकी भागीदारी
पाकिस्तानचा संघ त्यांच्या भेदक गोलंदाजीसाठी जाणला जातो. त्यात मेलबर्न मध्ये मागील काही दिवस पावसाळी वातावरण असल्याने खेळपट्टी ओलसर होती आणि गोलंदाजांना त्याची मदतही मिळत होती. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सुरवातीलाच भेदक मारा करत भारताचे पहिले ४ गडी अवघ्या ३१ धावांमध्ये बाद केले. सामना पाकिस्तानच्या मुठीत असताना विराटने हार्दिक पंड्या सोबत शतकी भागिदारी केली. विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांनी पाचव्या विकेटसाठी केलेली ११३ धावांची ही खेळी विजयाला गवसणी घालणारी ठरली केली.
हे ही वाचा: चित्तथरारक सामन्यात भारताचा पाकिस्तानवर विजय
या वर्षातला ३९ वा विजय
भारतीय क्रिकेट संघाने एका वर्षात आतापर्यंत ३९ विजयांवर आपले नाव नोंदवले आहे. या वर्षी भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला ३८वा सामना जिंकला होता. टी-२०, वनडे आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारांमधील हा ३८वा विजय होता. आता रविवारी ऑस्ट्रेलियातील मेलबर्नवर पाकिस्तानचा पराभव करत भारताने ३९वा विजय साकारला. या विजयानंतर भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे.