fbpx

MNS Vs NCP over Har Har Mahadev: ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून अविनाश जाधव – जितेंद्र आव्हाड आमने सामने

MNS Vs NCP over Har Har Mahadev: राजकारणात कुणीही कुणाचे कायम मित्र नसतात आणि वैरीही नसतात. राजकारणाची समीकरणे वेळेनुसार गरजेनुसार बदलत जातात आणि त्याप्रमाणे पक्षांमधले, राजकारण्यांमधले संबंधही बदलत जातात. असाच प्रकार ठाण्यातही नुकताच पाहिला मिळाला. निमित्त होते ‘हर हर महादेव‘ या चित्रपटावरून सुरु असलेल्या वादाचे.

MNS Vs NCP over Har Har Mahadev: राष्ट्रवादी आणि मनसे आमने सामने

राज्यातील सत्ता समीकरणे जशी बदलतात, तसे त्याचे पडसाद स्थानिक पातळीवरील राजकारणात दिसून येतात. नेमके हेच चित्र सध्या राज्यातील सत्ताबदलाचा केंद्रबिंदू असलेल्या ठाणे शहरात दिसून येत आहे.

राज्यात २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाणे शहर मतदार संघातून निवडणूक लढविणाऱ्या मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पाठिंबा देऊ केला होता त्यामुळे त्यांच्यातील मैत्री वाढली होती. पण ही मैत्री फार काळ टिकली नाही. मशिदीवरील भोंगे काढण्याच्या मुद्यावरून मनसेने आंदोलन पुकारले जे जितेंद्र आव्हाड यांच्या विचारधारेविरुद्ध होते. या आंदोलनाच्या मुद्दयावरून मनसे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांनी एकमेकांवर कडाडून टीका केली आणि आव्हाड आणि जाधव यांच्यातील मैत्रीमध्ये दुरावा निर्माण झाला. आता ‘हर हर महादेव’ या चित्रपटावरून हे दोन्ही नेते एकमेकांसमोर पुन्हा उभे (MNS Vs NCP over Har Har Mahadev) ठाकल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्रात घडलेल्या सत्तांतरानंतर आता मनसे, बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांच्यात जवळीक वाढली आहे आणि त्याचाही परिणाम ठाण्यातल्या या दोन नेत्यांच्या मैत्रीवर दिसून येत आहे. ‘हर हर महादेव’ या चित्रपटासाठी राज ठाकरे यांनी आवाज दिला आहे त्यामुळे मनसेचा या चित्रपटाला पाठिंबा असणे स्वाभाविक आहे. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आंदोलनामुळे या चित्रपटाला आणि अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांनाही त्यांनी विरोध केला आहे (MNS Vs NCP over Har Har Mahadev) असे दिसते.

हे ही वाचा: शिवसेनेचा दसरा मेळावा: ५६ वर्षांची परंपरा

इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप

जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील विवियाना माॅलमध्ये ७ नोव्हेंबरच्या रात्री सुरू असलेला ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने प्रेक्षकांना सिनेमागृहात बाहेर जाण्याचे आवाहन केले होते. या घटनेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि प्रेक्षक यांच्यात हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. घडलेल्या प्रकारावर मनसेचे अविनाश जाधव घटनास्थळी पोहचले. त्यानंतर त्यांनी बंद पडलेला हा शो पुन्हा सुरू केला.

यावेळी अविनाश जाधव यांनी माध्यमांना प्रतिक्रियाही दिली. ते म्हणाले, “चित्रपटगृहात येऊन प्रेक्षकांना मारझोड करणं हे कोणत्या संस्कृतीला धरून आहे? तुम्ही नेहमी संस्कृतीच्या गोष्टी करता ना? ही कुठली संस्कृती होती? हा चित्रपट आम्ही इथे बसून पाहणार. चित्रपटगृहात येऊन प्रेक्षकांना मारणं हे तुम्हाला कोणी शिकवलं?” या शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच “हा चित्रपट आम्ही इथे बसून बघणार,” असा पवित्रा त्यांनी घेतला.

मनसेच्या वतीने ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या शो चे पुन्हा आयोजन

दुसऱ्या दिवशी मनसेच्या वतीने ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या शो चे पुन्हा आयोजन करण्यात आले. त्यामुळे ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून दोन्ही नेत्यांतील राजकीय मैत्रीत तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. ‘हर हर महादेव’ हा चित्रपट मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नड या भाषांमध्येही प्रदर्शित करण्यात आला आहे. पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात सुबोध भावे, शरद केळकर अमृता खानविलकर आणि सायली संजीव हे मुख्य भूमिकेत आहेत.

पुण्यातदेखील संभाजी ब्रिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी शहरामध्ये सुरू असलेला ‘हर हर महादेव’ चित्रपट बंद पाडला होता. अविनाश जाधव यांच्याबरोबरीने मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही ट्वीटरवरुन या प्रकारावरुन संताप व्यक्त केला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *