MI Won Women’s IPL : २६ मार्च २०२३ ही तारीख इतिहासात स्वर्णाक्षरात लिहिली जाईल. भारतीय वुमन्स प्रीमियर लीग २०२३ च्या पहिल्याच सिझनमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने दणदणीत विजय मिळवत पहिल्या सीजनच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. आज मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर एक थरारक फायनल सामना पाहायला मिळाला. या अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सचा संघावर ७ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह त्यांनी या लीगमधील पहिले विजेतेपद पटकावण्याचा मानदेखील मिळवला.
MI Won Women’s IPL : शेवटच्या षटकापर्यंत रंगला सामना
वुमन्स प्रीमिअर लीगचा (Women’s IPL) हा अंतिम सामना अगदी शेवटच्या षटकापर्यंत रंगला. दोन्ही संघांनी पूर्ण जोर लावला पण मुंबई इंडियन्सच्या संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांमध्ये चांगली कामगिरी केली. दिल्ली कॅपिटल्सने ठेवलेल्या तुटपुंज्या १३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. मुंबईच्या पाठलागाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही, कारण यास्तिका भाटिया दुसऱ्याच षटकात बाद झाला आणि त्यानंतर सहकारी सलामीवीर हेली मॅथ्यू ही पॉवरप्लेमध्ये बाद झाली. अवघ्या २३ धावात दोन्ही सलामीवीर तंबूत परतले. मात्र त्यानंतर आलेल्या नॅटली सिव्हर-ब्रंट आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यात झालेल्या अर्धशतकी भागीदारीने मुंबईचा डाव सावरला.
हे ही वाचा: आयपीएल २०२३ चे वेळापत्रक
दिल्ली कॅपिटल्सची प्रभावी गोलंदाजी
डावाच्या पूर्वार्धात दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी मुंबई इंडियन्सला पुढे जाऊ दिले नाही. पण हरमनप्रीत कौर आणि नॅट सायव्हर-ब्रंट यांचा अनुभव कामी आला. त्यांनी सुरुवातीचे दडपण समर्थपणे हाताळले आणि विकेट्स जाऊ दिल्या नाहीत. एका लहान लक्ष्याचा पाठलाग करताना, त्यांनी सुरवातीला वेळ घेतला आणि उत्तरार्धात, हरमनने काही फटके खेळले पण एका महत्त्वपूर्ण क्षणी ती धावबाद झाली. मुंबईच्या अडचणी वाढणार असे वाटत होते. पण ब्रंट हिने विस्फटोक फलंदाजी करत मुंबईला विजय मिळवून दिला. ब्रंटला केरने 14 धावा काढत चांगली साथ दिली. ब्रंट हिने नाबाद 60 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान ब्रंट हिने सात चौकार लगावले. तर केर हिने दोन चौकार मारले. ब्रंट हिचे अर्धशतक आणि हरमनप्रीतची निर्णायाक खेळीच्या बळावर मुंबईने दिल्लीने दिलेले आव्हान तीन चेंडू आणि सात विकेट राखून पार केले. सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला पण १९ व्य षटकात फटकेबाजी करीत केर आणि ब्रंटने सामना मुंबईच्या दिशेने वळविला. नॅट स्कायव्हर-ब्रंटने तिच्या एलिमिनेटर खेळीचा फॉर्म पुढे चालू ठेवला आणि अर्धशतक पूर्ण केले आणि मेली केरच्या शेवटच्या षटकात तिने जोनासेनवर हल्ला केला आणि मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दिल्लीची खराब सुरवात
दिल्लीची कर्णधान मेग लॅनिंग हिने नाणेफिक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण मुंबईच्या गोलंदाजांनी एकापाठोपाठ एक दिल्लीला धक्के दिली. दिल्लीची अवस्था अतिशय बिकट झाली होती. आघाडीचे सर्व फलंदाज तंबूत परतले होते. अवघ्या 80 धावांत दिल्लीचे 7 विकेट गेल्या होत्या. 87 धावांत दिल्लीचे नऊ फलंदाज माघारी परतले होते. पण शिखा पांडे आणि राधा यादव यांनी विस्फोटक फलंदाजी करत दिल्लीला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली.
राधा-शिखाची झुंझार खेळी व्यर्थ
दिल्ली कॅपिटल्सच्या नऊ विकेट ७९ धावांत पडल्या होत्या. संघाला १०० धावांचा टप्पाही गाठता येणार नाही, असे वाटत होते. तिथून शिखा पांडे आणि राधा यादवने डाव सांभाळला. दोघींनी शेवटच्या विकेटसाठी २४ चेंडूत नाबाद ५२ धावांची भागीदारी केली. राधाने १२ चेंडूत नाबाद २७ तर शिखाने १७ चेंडूत नाबाद २७ धावा केल्या. राधाने आपल्या खेळीत दोन चौकार आणि दोन षटकार मारले. त्याचवेळी शिखाच्या बॅटमधून तीन चौकार बाहेर पडले. तिने षटकारही मारला.
दिल्लीच्या दिग्गज फलंदाजांनी या सामन्यात निराशा केली. कर्णधार मेग लॅनिंग वगळता कोणीही जास्त वेळ क्रीजवर टिकू शकले नाही. लॅनिंगने २९ चेंडूत ३५ धावा केल्या. ती दुर्दैवाने धावबाद झाली. मारिझान कॅपने १८ आणि शफाली वर्माने ११ धावांचे योगदान दिले. मुंबईकडून इस्सी वोंग आणि हीली मॅथ्यूजने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. अमेलिया केरला दोन विकेट्स घेण्यात यश मिळाले.