MG Comet EV : ब्रिटिश कार कंपनी एमजीने भारतीय बाजारात एप्रिल महिन्याच्या अखेरीस आपली दुसरी इलेक्ट्रिक कार कॉमेट आणली. लाँचिंग वेळी कंपनीने याचे फक्त एकाच व्हेरियंटची माहिती दिली होती. परंतु, आता याच्या अन्य व्हेरियंट्सची घोषणा केली आहे. या कारचे एकूण तीन व्हेरियंट्स उपलब्ध होतील.
MG Comet EV : बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार
MG Motors ने एप्रिल २०२३ मध्ये भारतात आपली बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार Comet EV लाँच केली आहे. कंपनीने आपल्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार कॉमेट ईव्हीची बुकिंग १५ मे पासून सुरू केली आहे. त्याचवेळी, कंपनीने २२ मे पासून निवडक शहरांमध्ये डिलिव्हरी सुरू केली आहे. ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असल्याचा कंपनीने दावा केलाय. ग्राहक ही कार फक्त ११,००० रुपयांत बुक करू शकतात. या कारची रेंज २३० किलोमीटर आहे.
MG Comet EV ची किंमत
कॉमेट ईव्ही ही सर्वात लहान इलेक्ट्रिक कार असून ती पेस, प्ले आणि प्लश या तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. कॉमेट ईव्ही ही सर्वात लहान इलेक्ट्रिक कार असून ती पेस, प्ले आणि प्लश या तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. केवळ ७.९८ लाख रुपयाच्या इंट्रोडक्टरी किमतीत सुरुवातीच्या ५ हजार ग्राहकांना मिळणार आहे. यानंतर एमजी आपल्या स्वस्त इलेक्ट्रिक कारच्या किमतीत वाढ करू शकते.
हे ही वाचा : टेस्ला आता भारतात वाहनांचे उत्पादन करणार
देशातील सर्वात छोटी कार
एमजी कॉमेट इव्ही (MG Comet EV ) ही ड्युअल-डोर असलेली ४-सीटर कार आहे. कॉमेट देशातील सर्वात छोटी कार आहे. याची एकूण लांबी २९७४ एमएम आहे. याची रुंदी १५०५ एमएम, उंची १६४० एमएम आहे. कारचे व्हीलबेस २०१० एमएम आहे. तसेच याचे टर्निंग रेडियस ४.२ मीटर आहे. एमजी कॉमेट इव्हीमध्ये १७.३ kWh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरीला IP६७ रेटिंग असून ८ वर्षे किंवा १.२० लाख किलोमीटरची वारंटी मिळते.
MG Comet EV चे फीचर्स
एमजीची नवीन कॉमेट इलेक्ट्रिक कार मध्ये अनेक खास फीचर्स दिले आहेत. कारमध्ये सुरक्षेचे खास ध्यान ठेवले गेले आहे. यात एअरबॅग, टीपीएमएस, एबीएस, ईबीडी सारखे फीचर्स दिले आहेत. कारचे एक्सटीरियर मध्ये कनेक्टेड एलईडी डीआरएल, एलईडी हेडलाइट्स, एलईडी टेल लाइट्स दिली आहे. यासोबत इंटिरियर मध्ये अॅपल आयपॉड मधून स्टेयरिंग बट्स, १०.२५ इंचाचा इंस्ट्रूमेंट क्लस्टर, १०.२५ इंचाचा इंफोटेनमेंट सिस्टम, स्पीकर, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, ड्युअल कलर्ड इंटिरियर, अॅप्पल कार प्ले, अँड्रॉयड ऑटो मिळते.