fbpx

Marathi Actors in Govinda Naam Mera: ‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपटात दिसणार अनेक मराठी कलाकार

Marathi Actors in Govinda Naam Mera: विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी स्टारर ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर वरून चित्रपट मर्डर मिस्ट्री कॉमेडी असल्याचं दिसून येतंय आणि हा चित्रपट खूपच मजेशीर असेल असं वाटतय. या ट्रेलरमध्ये दिसून आलेली आणखी एक सुखावणारी गोष्ट म्हणजे त्यात दिसून आलेले मराठी कलाकार (Marathi Actors in Govinda Naam Mera). एकापेक्षा एक कसलेले मराठी कलाकार या सिनेमात पाहायला मिळणार आहेत त्यामुळे या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

मर्डर मिस्ट्री कॉमेडी

अभिनेता विकी कौशलला तुम्ही आत्तापर्यंत चित्रपटांमध्ये गंभीर भूमिका करताना पाहिलं असेल, पण आता विकी एका कॉमेडी सिनेमात दिसणार आहे. विकीच्या ‘गोविंदा नाम मेरा’ (Govinda Naam Mera Trailer Release) चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात विकीसह कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Penekar) यांच्या मुख्य भूमिका आहेत. ट्रेलरमध्ये कॉमेडीपासून सस्पेन्सपर्यंत सर्व काही अतिशय मसालेदार पद्धतीने दाखवण्यात आले आहे. सिनेमाच्या ट्रेलरवरुन असे समजते आहे की ‘गोविंदा नाम मेरा’ हा सिनेमा कॉमेडी टच असणारी मर्डर मिस्ट्री आहे.

Marathi Actors in Govinda Naam Mera: मराठी कलाकारांची फौज

या सिनेमाचा ट्रेलर जर तुम्ही पाहिला असेल तर एक गोष्ट लक्षात येईल की ‘गोविंदा नाम मेरा’मध्ये एकापेक्षा एक सरस असे मराठी कलाकार दिसणार आहे. या सिनेमातील मराठी कलाकारांच्या यादीत रेणुका शहाणे, अमेय वाघ, सयाजी शिंदे, तृप्ती खामकर हे आहेत. हे तीनही कलाकार एखाद्या महत्त्वाच्या भूमिकेत या सिनेमात दिसणार आहेत.

हे ही वाचा: ‘आदिपुरुष’च्या प्रदर्शनाची तारीख बदलली, चाहते म्हणतात – लूक आणि VFX बदला, तारीख नाही

Govinda Naam Mera कसा आहे चित्रपट?

सिनेमाच्या कथानकाविषयी सांगायचे झाल्यास विकी कौशल गोविंदाच्या भूमिकेत आहे. भूमी त्याच्या पत्नीच्या तर कियारा त्याच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत आहे. गोविंदा हा एक कोरिओग्राफर आहे जो आपल्या पत्नीला कंटाळला आहे आणि घटफोट घेण्याच्या विचारात आहे. ट्रेलरमध्ये त्याची पत्नी त्याला सारखी ओरडताना दिसत आहे. जेव्हा गोविंदा आपल्या पत्नीला ही इच्छा बोलून दाखवतो तेव्हा ती त्याच्याकडे २ कोटी रुपये मागते. त्यानंतर ट्रेलरमध्ये एक मोठा ट्विस्ट दाखवण्यात आला आहे. एक खून होतो आणि चित्रपटाची कथा कॉमेडीवरून मर्डर मिस्ट्रीकडे वळते. या खूनाचा संशय गोविंदा आणि त्याच्या गर्लफ्रेंडवर येतो. आता नेमका खून कुणाचा होतो? खून होतो की नाही? खून कोण करतं? या सर्व प्रश्नांची उत्तरं सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच समजेल.

कधी आणि कुठे पाहता येणार सिनेमा?

‘गोविंदा नाम मेरा’ हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर १६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन शशांक खैतानने केले आहे तर करण जोहरने निर्मिती केली आहे. याआधी असे जाहीर करण्यात आले होते की हा सिनेमा १० जून २०२२ रोजी प्रदर्शित होईल, पण काही कारणास्तव ही तारीख पुढे ढकलण्यात आली. आता ‘गोविंदा नाम मेरा’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *