fbpx

Maharashtra Rajya Geet: महाराष्ट्राचे ‘राज्यगीत’

Maharashtra Rajya Geet: महाराष्ट्राला लवकरच एक राज्यगीत मिळणार असून सर्वांच्याच तोंडी बसलेलं ‘जय जय महाराष्ट्र माझा’ (Jay Jay Maharashtra Majha) गीत यासाठी अंतिम करण्यात आलं आहे. मूळ गीताची लांबी जास्त असल्यामुळे या गीतामधील फक्त पहिली दोन कडवी घेऊन त्याला राज्यगीताचा (Maharashtra Rajya Geet) दर्जा देण्यावर एकमत झाल्याचीही माहिती समोर आली आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.

Maharashtra Rajya Geet: या गीताची निवड!

‘जय जय महाराष्ट्र माझा’ (Jai Jai Maharashtra Majha) हे राज्यगीत होणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Minister Sudhir Mungantiwar) यांनी दिली आहे. हे गाणं राज्यगीत (Maharashtra Rajya Geet) झाल्यानंतर अधिकृत गाणं असलेल्या देशातील निवडक राज्यांच्या यादीत लवकरच महाराष्ट्राचा समावेश होऊ शकतो अशी माहिती मंत्री मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली आहे. राज्य सरकार ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्याचे अधिकृत राज्य गीत म्हणून अंतिम रूप देण्याच्या तयारीत आहे.

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली असून या गीतामधील दोन कडवी घेतली जाणार असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे.

“गर्जा महाराष्ट्र माझा हे उत्साह वाढवणारं गीत आहे. या गीताच्या शब्दांमध्ये एक उर्जा आहे. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ही भावना आहे. हे गीत साडेतीन मिनिटं वाजायचं. त्यामुळे आम्ही अनुमती घेऊन एक ते दोन मिनिटांमध्ये यातली दोन कडवी घेऊन त्याला राज्यगीताचा दर्जा देण्याचा विचार केला आहे”, असं मुनगंटीवार म्हणाले.

सध्या ११ राज्यांकडे आहे राज्यगीत

सध्या देशातील फक्त 11 राज्यांचेच स्वत:चे गाणे आहे. यात आता महराष्ट्राचे देखील स्वत:चे गीत (Maharashtra Rajya Geet) असेल. अधिकृत राज्य गीत म्हणून ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गाण्याला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्राचे ‘राज्यगीत’ (Maharashtra Rajya Geet) म्हणून मान्यता मिळेल, अशी माहिती मंत्री मुनगंटीवार यांनी दिली आहे. हे गीत कवी रादा बधे यांनी लिहिले आहे. तर श्रीनिवास खळे यांनी त्याला संगीत दिले आहे. कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी हे गीत गायले आहे.

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले त्यावेळी मुंबईमधील दादर येथील शिवाजी पार्क येथे झालेल्या समारंभात शाहीर साबळे यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणे गायले होते. या गाण्यातील मूळ शब्द बदलले जाणार नाहीत. कार्यक्रमांच्या सुरुवातीला हे गाणे गायले जाईल आणि राष्ट्रगीताने संबंधित कार्यक्रमाची सांगता होईल, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *