Kushal Badrike in Marathi Movie Ravrambha : कुशल बद्रिके पहिल्यांदाच दिसणार नकारात्मक भूमिकेत

Kushal Badrike in Marathi Movie Ravrambha : कुशल सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चांगलाच चर्चेत आहे. सध्या तो संजय जाधव यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनला गेला आहे. अशातच त्याच्या आणखी एका आगामी चित्रपटातील त्याचा लूक आता समोर आला आहे. ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटात कुशल नकारात्मक भूमिका साकारणार आहे. आपल्या कॉमेडी टायमिंगनं प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) आता वेगळ्या रूपात प्रेक्षकांना दिसणार आहे. त्याचं हे रूप भल्याभल्यांना धडकी भरवणार आहे. ‘रावरंभा’ (Ravrambha) या ऐतिहासिक चित्रपटात तो क्रूरकर्मा ‘कुरबतखान’ ही भूमिका साकारणार आहे. त्याचं हे रूप भल्याभल्यांना धडकी भरवणार आहे. नुकताच त्याचा या चित्रपटातील लूक समोर आला असून त्यात त्याच्या नजरेतून या व्यक्तिरेखेच्या क्रूरपणाचा अंदाज येत आहे.

Kushal Badrike in Marathi Movie Ravrambha: या भूमिकेबद्दल कुशल काय म्हणाला?

या भूमिकेबद्दल कुशल म्हणाला, “बहलोलखानचा वफादार आणि शाही सल्तनतीचा राखणदार असलेला ‘कुरबतखान’ हा विजापूरचा क्रूर हेर होता. बघणाऱ्याला चीड येईल अशी ही भूमिका साकारणं हे खरंतर माझ्यातल्या अभिनेत्यासाठी आव्हानात्मक होतं. त्यामुळे दिसण्यातला वेगळेपणा आणि लकबी आत्मसात करून ही भूमिका मी साकारली आहे. ही भूमिका प्रेक्षकांना आवडेल, अशी मला खात्री आहे.” हा चित्रपट १२ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. बहलोलखानचा वफादार आणि शाही सल्तनतीचा राखणदार असलेला ‘कुरबतखान’ हा विजापूरचा क्रूर हेर होता. ‘बघणाऱ्याला चीड येईल अशी ही भूमिका साकारणं हे खरंतर माझ्यातल्या अभिनेत्यासाठी आव्हानात्मक होतं. त्यामुळे दिसण्यातला वेगळेपणा आणि लकबी आत्मसात करून ही भूमिका मी साकारलीय. प्रेक्षकांच्या ती पसंतीस पडेल, अशी मला खात्री आहे’, असं कुशल म्हणाला.

Kushal Badrike Marathi Movie : विनोदाचा हुकमी एक्का

अभिनेता कुशल बद्रिके हा गेली अनेक वर्ष त्याचा विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आला आहे. विनोदाचा हुकमी एक्का म्हणून त्याला ओळखले जाते. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामधील त्याच्या कामाचे नेहमीच भरभरून कौतुक होते. त्याच्या विनोदाच्या टायमिंगला आणि त्याच्या उत्स्फूर्तेला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात. विनोदी अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेला कुशल आता पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेमध्ये दिसणार आहे.

‘रावरंभा’ 12 मे ला चित्रपटगृहात दाखल होणार

शशिकांत पवार प्रोडक्शन निर्मित ‘रावरंभा’ (Kushal Badrike Marathi Movie Ravrambha) चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. छायांकन संजय जाधव तर संकलन फैजल महाडिक यांचे आहे. सहनिर्माते अजित भोसले आणि संजय जगदाळे आहेत तर कार्यकारी निर्माते महेश भारांबे, अन्वय नायकोडी आहेत. गुरु ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेल्या गीतांना अमितराज यांनी संगीत दिले आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचे आहे. वेशभूषा पौर्णिमा ओक, रंगभूषा प्रताप बोऱ्हाडे, कलादिग्दर्शन वासू पाटील यांचे आहे. साहसदृश्ये शेवोलिन मलेश यांची आहेत. व्हीएफएक्सची जबाबदारी वॉट स्टुडिओ आणि जयेश मलकापूरे यांनी सांभाळली आहे. ध्वनीसंकलन दिनेश उच्चील, शंतनू अकेरकर यांचे आहे. प्रशांत नलवडे निर्मिती व्यवस्थापक आहेत. 12 मे ला ‘रावरंभा’ ही ऐतिहासिक प्रेमकहाणी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *