fbpx

Jet Airways पुन्हा आकाशात घेणार भरारी, डीजीसीएकडून मिळाले विमानतळ ऑपरेटर प्रमाणपत्र

Jet Airways : ३१ जुलै २०२३ हा जेट एअरवेजसाठी खूप महत्त्वाचा दिवस ठरला आहे. देशांतर्गत विमान कंपनी जेट एअरवेजला विमान वाहतूक नियामक डीजीसीए (DGCA) ने एअरपोर्ट ऑपरेटर सर्टिफिकेट (AOC) जारी केले आहे. यामुळे जेट एअरवेजचा भारतात पुन्हा विमानसेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जेट एअरवेजला मिळालेल्या या मंजुरीबद्दलची माहिती जालान-कॅलरॉक कन्सोर्टियम दिली. हे कंसोर्टियम जेट एअरवेजची विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे.

Jet Airways : दिवाळखोरीमुळे ४ वर्षांपासून उड्डाणे बंद

दिवाळखोरीत गेल्यामुळे जेट एअरवेज चार वर्षांपूर्वी 2019 मध्ये बंद करण्यात आली होती. आता जेट एअरवेजला विमानसेवा सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. जालान-कॅलरॉक कन्सोर्टियमने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले की, जेट एअरवेज पुन्हा सुरू करण्यासाठी जालान-कॅलरॉक कन्सोर्टियमवर विश्वास दाखवणाऱ्या डीजीसीए आणि सर्व भागधारकांचे आम्ही आभार मानतो. जालान-कॅलरॉक कंसोर्टियम जेट एअरवेजच्या पुनरुज्जीवनासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. यासाठी कन्सोर्टियम सर्व प्राधिकरण, उद्योग आणि भागधारक यांच्याशी समन्वयाने काम करून विमान कंपनीला यशस्वी करण्यासाठी धोरण विकसित करेल.

26 वर्षांच्या सेवेनंतर दिवाळखोरीत

जेट एअरवेजची उड्डाणे 1993 मध्ये सुरू झाली. मात्र, सुमारे 26 वर्षे सेवा दिल्यानंतर कंपनीचे आर्थिक आरोग्य बिघडले. जेट एअरवेजची उड्डाणे 17 एप्रिल 2019 रोजी बंद करण्यात आली. देशातील 65 हून अधिक आणि भारताबाहेरील 124 ठिकाणांसाठी कंपनीने उड्डाणे चालवली. आर्थिक स्थिती बिघडल्यानंतर एनसीएलटीने जालान-कॅलरॉक कंसोर्टियमला त्याचे पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी सोपवली. मात्र, जेट एअरवेजच्या धावपट्टीवर परतण्याच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा धक्का बसला. कारण कर्जदारांनी 10 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की एनसीएलटी रिझोल्यूशन प्लॅन काम करत नाही.

हे ही वाचा : महाराष्ट्रात तयार होत आहेत तब्बल 14 नवीन महामार्ग

8,000 कोटी रुपये थकीत

कर्जदारांनी सांगितले की, कन्सोर्टियमने अद्याप एक पैसाही गुंतविला नाही. त्यामुळे कंपनीची मालमत्ता विकण्याची परवानगी द्यावी. जेट एअरवेजकडे एसबीआय, पीएनबी, आयडीबीआयI, कॅनरा बँक आणि आयसीआयसीआय बँकेसह इतर वित्तीय संस्थांचे 8,000 कोटी रुपये थकीत आहेत. कंसोर्टियम या दिशेने वाटचाल करत असले तरी काही दिवसांपूर्वी जतिंदरपाल सिंग धिल्लन यांची नवीन लेखा व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता पुन्हा उड्डाणासाठी डीजीसीएकडून मंजुरी मिळाली आहे.

मंजुरी मिळताच शेअरने घेतली उसळी

जेट एअरवेजच्या विमानतळ ऑपरेटर प्रमाणपत्राच्या नूतनीकरणाचाही त्याच्या शेअरवरही परिणाम झाला. वंदे महाराष्ट्र (Vande Maharashtra) ला मिळालेल्या माहिती नुसार, जेट एअरवेजचे शेअर्स सोमवारी अपर सर्किटवर उघडले. दुपारपर्यंतही त्यात अप्पर सर्किट होते. यामुळे जेट एअरवेजचा हिस्सा ४.९८ टक्के म्हणजेच २.४१ रुपयांच्या वाढीसह ५०.८० रुपयांवर आला आहे. तसेच कंपनीचे बाजारमूल्य ५७७.०७ कोटी रुपयांवर पोहोचले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *