fbpx

Travel Now Pay Later: IRCTC ने सुरु केली ‘ट्रॅव्हल नाऊ पे लेटर’ सुविधा

Travel Now Pay Later: भारतीय रेल्वे च्या IRCTC या तिकीट बुकिंग स्थळावर आता ‘ट्रॅव्हल नाऊ पे लेटर’ (Travel Now Pay Later) ही नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या नव्या खास सुविधेनुसार, प्रवाशांना एकही पैसा न देता तिकीट बुक करता येणार आहे. या प्रवासाचे पैसे नंतर देता येणार आहे. ही सुविधा IRCTC च्या रेल कनेक्ट ऍपवरही उपलब्ध आहे.

CASHe सोबत भागिदारी

ट्रॅव्हल नाऊ पे लेटर (Travel Now Pay Later) ची सुविधा देण्यासाठी IRCTC ने CASHe सोबत भागिदारी केली आहे.

CASHe चे चेअरमन व्ही. रमन कुमार यांनी सांगितले की, IRCTC च्या ‘रेल कनेक्ट’ ऍपच्या माध्यमातून ट्रॅव्हल नाऊ पे लेटर (Travel Now Pay Later) ही सुविधा संपूर्ण देशात लागू करण्यात आली आहे. या ऍपच्या माध्यमातून देशभरात जवळपास 15 लाख लोक तिकीट बुक करतात.

भारतात प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य दिले जाते. सण-उत्सवाच्या काळात रेल्वे प्रवाशांची संख्या वाढत असते. प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेकडून विशेष ट्रेन चालवण्यात येतात. या विशेष ट्रेनमधून प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी आयआरसीटीसीने ही नवीन सुविधा सुरू केली आहे.

तिकीट बुकिंगनंतर सहा महिन्यांनी भरता येतील पैसे

दिवाळीनिमित्त तुम्ही घरी, पर्यटनासाठी प्रवास करणार असाल तर ट्रॅव्हल नाऊ पे लेटर (Travel Now Pay Later) या खास सुविधेचा वापर करता येईल. अनेकदा लोकांना आपात्कालीन परिस्थितीत तिकिट बुक करावी लागते. कधीतरी आवश्यक असलेली रक्कम खात्यात नसते किंवा इतर कामांसाठी ती राखीव असते. अशावेळी तिकिटाचे पैसे भरण्यासाठी काळजावर दगड ठेवून खर्च करण्याची किंवा कुणाकडे मदत मागण्याची आता गरज नाही. अशा वेळी तुम्ही रक्कम उभारण्याची ट्रॅव्हल नाऊ पे लेटर (Travel Now Pay Later) या योजनेचा वापर करू शकता.

EMI चा पर्याय

या नव्या सुविधेमुळे प्रवासी तिकीट बुक करू शकतात. तुम्ही CASHe चा पर्याय वापरून EMI चा पर्याय निवडून तिकीट बुक शकता. विशेष म्हणजे CASHe च्या ट्रॅव्हल नाऊ पे लेटर सुविधेमार्फत साधारण आणि तात्काळ दोन्हीही प्रकारची तिकीटे बुक करू शकता. तिकीटासाठीची रक्कम तीन ते सहा महिन्याच्या कालावधीत हप्त्याने भरू शकता. या सु्विधेचा वापर करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही डॉक्युमेंटची आवश्यकता नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *