fbpx

Tata IPL 2023 Schedule: आयपीएल २०२३ चे वेळापत्रक

Tata IPL 2023 Schedule: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 16व्या हंगामाचे वेळापत्रक (Tata IPL 2023 Schedule) जाहीर केले आहे. २०२३च्या हंगामातील पहिली लढत विद्यमान विजेते गुजरात टायटन्स आणि चार वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. ही लढत अहमदाबाद येथे होतील. पहिल्या मॅचची सुरुवात भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता होईल. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १ एप्रिल रोजी डबल हेडर खेळवली जाईल. यातील पहिली मॅच पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात तर दुसरी लढत लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. 28 मे रोजी अंतिम सामना होणार आहे.

Tata IPL 2023 Schedule: 18 डबल हेडर सामने

स्पर्धेत एकूण 18 डबल हेडर असतील, म्हणजेच एका दिवसात 18 वेळा 2 सामने होतील. या दरम्यान, पहिला सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल आणि दुसरा सामना 7:30 वाजता सुरू होईल. 31 मार्च रोजी गुजरात आणि चेन्नई यांच्यातील पहिला सामना, आणखी त्यानंतर एक सामना होईल. तर 2 एप्रिलला दोन डबल हेडर सामने होतील.

1 एप्रिल रोजी पंजाब-कोलकाता आणि लखनऊ-दिल्ली यांच्यात पहिला सामना होणार आहे. त्याचवेळी, 2 एप्रिल रोजी सनरायझर्स-राजस्थान यांच्यात पहिला सामना आणि दुसरा सामना बेंगळुरू-मुंबई यांच्यात होणार आहे. 8 एप्रिलला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे.

Tata IPL 2023 Schedule: 58 दिवसांत 74 सामने

आयपीएल २०२३ मध्ये साखळी फेरीत ७० लढती होणार आहे. त्यापैकी १८ लढतींचा समावेश डबल हेडरमध्ये करम्यात आला आहे. 58 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 10 संघांमध्ये एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. एक संघ 14 सामने खेळणार आहे. 10 संघांमध्ये लीग टप्प्यातील 70 सामने होतील. लीग स्टेजनंतर, पॉइंट टेबलमधील टॉप-4 संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतील.

Tata IPL 2023 Schedule: पुन्हा एकदा होम-अवे फॉरमॅटमध्ये स्पर्धा

कोरोना विषाणूच्या साथीमुळे 2020 मध्ये, IPL चा अर्धा हंगाम भारतात आणि अर्धा UAE मध्ये आयोजित करावा लागला होता. तर 2021 चा हंगाम देखील फक्त UAE मध्ये खेळला गेला. गेल्या हंगामातील 70 लीग सामने महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे शहरात बांधलेल्या 4 स्टेडियममध्ये खेळले गेले. त्यानंतर कोलकाता आणि अहमदाबादमध्ये प्लेऑफचे सामने झाले.

यावेळीही 2019 च्या हंगामाप्रमाणे सर्व सामने होम आणि अवे फॉरमॅटमध्ये खेळवले जातील. म्हणजेच, स्पर्धेतील सर्व संघ साखळी टप्प्यातील 14 पैकी 7 सामने त्यांच्या घरच्या मैदानावर आणि उर्वरित 7 सामने विरोधी संघाच्या घरच्या मैदानावर खेळतील. प्लेऑफचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जातील.

हे ही वाचा: हे आहेत इंडियन प्रीमियर लीग 2023 मधील नवीन नियम

Tata IPL 2023 Schedule: कोणत्या मैदानावर होणार लढती?

आयपीएल २०२३च्या हंगामातील लढती देशातील १२ मैदानांवर होणार आहे. यात अहमदाबाद, मोहाली, लखनौ, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, मुंबई, गुवाहाटी आणि धर्मशाळा यांचा समावेश आहे.

१० संघांची दोन गटात विभागणी

स्पर्धेतील १० संघांना दोन गटात विभागण्यात आले आहे. Ipl 2023 Teams & Group |आयपीएल 2023 संघ आणि गट

अ गट
मुंबई इंडियन्स
कोलकाता नाईट रायडर्स
राजस्थान रॉयल्स
दिल्ली कॅपिटल्स
लखनऊ सुपरजायंट्स

ब गट
चेन्नई सुपर किंग्ज
सनरायझर्स हैदराबाद
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
पंजाब किंग्ज
गुजरात टायटन्स

Tata IPL 2023 Schedule | आयपीएल २०२३ चे वेळापत्रक

साखळी सामने

सामना क्रमांकसामनादिनांकवेळ
1गुजरात Vs चेन्नई31 मार्च7:30 PM
2पंजाब Vs कोलकाता01 एप्रिल3:30 PM
3लखनऊ Vs दिल्ली01 एप्रिल7:30 PM
4हैद्राबाद Vs राजस्थान02 एप्रिल3:30 PM
5बँगलोर Vs मुंबई02 एप्रिल7:30 PM
6चेन्नई Vs लखनऊ03 एप्रिल7:30 PM
7दिल्ली Vs गुजरात04 एप्रिल7:30 PM
8राजस्थान Vs पंजाब05 एप्रिल7:30 PM
9कोलकाता Vs बँगलोर06 एप्रिल3:30 PM
10लखनऊ Vs हैद्राबाद07 एप्रिल7:30 PM
11राजस्थान Vs दिल्ली08 एप्रिल3:30 PM
12मुंबई Vs चेन्नई08 एप्रिल7:30 PM
13गुजरात Vs कोलकाता09 एप्रिल7:30 PM
14हैद्राबाद Vs पंजाब09 एप्रिल7:30 PM
15बँगलोर Vs लखनऊ10 एप्रिल7:30 PM
16दिल्ली Vs मुंबई11 एप्रिल7:30 PM
17चेन्नई Vs राजस्थान12 एप्रिल3:30 PM
18पंजाब Vs गुजरात13 एप्रिल7:30 PM
19कोलकाता Vs हैद्राबाद14 एप्रिल7:30 PM
20बँगलोर Vs दिल्ली15 एप्रिल3:30 PM
21लखनऊ Vs पंजाब15 एप्रिल7:30 PM
22मुंबई Vs कोलकाता16 एप्रिल3:30 PM
23गुजरात Vs राजस्थान16 एप्रिल7:30 PM
24बँगलोर Vs चेन्नई17 एप्रिल7:30 PM
25हैद्राबाद Vs मुंबई18 एप्रिल7:30 PM
26राजस्थान Vs लखनऊ19 एप्रिल7:30 PM
27पंजाब Vs बँगलोर20 एप्रिल3:30 PM
28दिल्ली Vs कोलकाता20 एप्रिल7:30 PM
29चेन्नई Vs हैद्राबाद21 एप्रिल7:30 PM
30लखनऊ Vs गुजरात22 एप्रिल3:30 PM
31मुंबई Vs पंजाब22 एप्रिल7:30 PM
32बँगलोर Vs राजस्थान23 एप्रिल3:30 PM
33कोलकाता Vs चेन्नई23 एप्रिल7:30 PM
34हैद्राबाद Vs दिल्ली24 एप्रिल7:30 PM
35गुजरात Vs मुंबई25 एप्रिल7:30 PM
36बँगलोर Vs कोलकाता26 एप्रिल7:30 PM
37राजस्थान Vs चेन्नई27 एप्रिल7:30 PM
38पंजाब Vs लखनऊ28 एप्रिल7:30 PM
39कोलकाता Vs गुजरात29 एप्रिल3:30 PM
40दिल्ली Vs हैद्राबाद29 एप्रिल7:30 PM
41चेन्नई Vs पंजाब30 एप्रिल3:30 PM
42मुंबई Vs राजस्थान30 एप्रिल7:30 PM
43लखनऊ Vs बँगलोर01 मे3:30 PM
44गुजरात Vs दिल्ली02 मे7:30 PM
45पंजाब Vs मुंबई03 मे7:30 PM
46लखनऊ Vs चेन्नई04 मे3:30 PM
47हैद्राबाद Vs कोलकाता04 मे7:30 PM
48राजस्थान Vs गुजरात05 मे7:30 PM
49चेन्नई Vs मुंबई06 मे3:30 PM
50दिल्ली Vs बँगलोर06 मे7:30 PM
51गुजरात Vs लखनऊ07 मे3:30 PM
52राजस्थान Vs हैद्राबाद07 मे7:30 PM
53कोलकाता Vs पंजाब08 मे7:30 PM
54मुंबई Vs बँगलोर09 मे3:30 PM
55चेन्नई Vs दिल्ली10 मे7:30 PM
56कोलकाता Vs राजस्थान11 मे7:30 PM
57मुंबई Vs गुजरात12 मे7:30 PM
58हैद्राबाद Vs लखनऊ13 मे3:30 PM
59दिल्ली Vs पंजाब13 मे7:30 PM
60राजस्थान Vs हैद्राबाद14 मे3:30 PM
61चेन्नई Vs कोलकाता14 मे7:30 PM
62गुजरात Vs हैद्राबाद15 मे3:30 PM
63लखनऊ Vs मुंबई16 मे7:30 PM
64पंजाब Vs दिल्ली17 मे7:30 PM
65हैद्राबाद Vs बँगलोर18 मे7:30 PM
66पंजाब Vs राजस्थान19 मे7:30 PM
67दिल्ली Vs चेन्नई20 मे3:30 PM
68कोलकाता Vs लखनऊ20 मे7:30 PM
69मुंबई Vs हैद्राबाद21 मे3:30 PM
70बँगलोर Vs गुजरात21 मे7:30 PM

प्लेऑफचे सामने (Play-offs):

सामना क्रमांकसामनादिनांकवेळ
71क्वाॅलिफायर 124 मे7:30 PM
72एलिमिनेटर25 मे7:30 PM
73क्वाॅलिफायर 227 मे7:30 PM
74अंतिम सामना29 मे7:30 PM

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *