fbpx

iPhone manufacturing : भारतात टाटा तयार करणार आयफोन

iPhone manufacturing : जगातील सर्वात प्रसिद्ध आणि ग्लॅमरस मोबाईल अशी ख्याती असलेल्या आयफोनची निर्मिती भारतात टाटा समुहाची फॅक्टरी करणार आहे. टाटा समूह बंगळुरू येथे आयफोनची निर्मिती (iPhone manufacturing) करणार आहे. यासाठी टाटा समुहाने बंगळुरु येथील ॲपल आयफोन तयार करणारी पार्टनर कंपनी विस्ट्रॉनची फॅक्टरी खरेदी केली आहे. टाटा समूह भारतात तयार करणार असलेले आयफोन देशातच नाही तर परदेशांतही विक्रीसाठी पाठविले जातील अशी माहिती मिळाली आहे.

कुक आणि चंद्रशेखरन यांच्यात सविस्तर चर्चा

काही दिवसांपूर्वी ॲपलचे सीईओ टीम कुक यांनी मुंबई आणि नवी दिल्ली येथे अॅपलच्या स्टोअरचे उद्घाटन केले होते. भारत दौऱ्यादरम्यान कुक यांनी टाटा समुहाचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांची भेट घेतली होती. वंदे महाराष्ट्र (Vande Maharashtra) ला मिळालेल्या माहिती नुसार, या भेटीत या दोघांमध्ये भारतातील योजनांबाबत सविस्तर चर्चा झाली होती. याआधी विस्ट्रॉनने आयफोन निर्मिती (iPhone manufacturing) मधून बाहेर पडून टप्प्याटप्प्याने दुसऱ्या प्रकल्पात गुंतवणूक करण्याची तयारी सुरू केली होती. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर टाटा समुहाने विस्ट्रॉनची बंगळुरूतील आयफोन तयार करणारी फॅक्टरी खरेदी केली आहे.

हे ही वाचा : MG ची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार Comet EV लाँच

आयफोनच्या दोन मॉडेलचे उत्पादन भारतात

ट्रेन्ड फोर्सच्या रिपोर्टनुसार अॅपल कंपनी यंदाच्या वर्षी (2023) चार आयफोन मॉडेल लाँच करणार आहे. यापैकी दोन मॉडेलचे उत्पादन भारतात होणार आहे. या दोन मॉडेलमध्येच आयफोन 15 (iPhone 15) याचाही समावेश असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *