Rahul Dravid on break: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी राहुल द्रविडला मिळाला ब्रेक

Rahul Dravid on break: भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना काही दिवसांची विश्रांती (Rahul Dravid on break) देण्यात आली असून व्हीव्हीएस लक्ष्मण झिम्बाब्वे दौऱ्यावर भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवणार आहेत. राहुलचे सपोर्ट स्टाफ सदस्य विक्रम राठौर, फलंदाजी प्रशिक्षक आणि पारस म्हांबरे, गोलंदाजी प्रशिक्षक यांनाही विश्रांती देण्यात आली आहे आणि लक्ष्मणकडे माजी लेगस्पिनर साईराज बहुतुले आणि हृषिकेश कानिटकर हे उपनियुक्त असतील. द्रविड या महिन्याच्या अखेरीस आशिया कपसाठी संघात सामील होणार आहे.

हे ही वाचा: पुजाराचे धुव्वाधार अर्धशतक

Rahul Dravid on break: राहुल द्रविडला ब्रेक

गेल्या नोव्हेंबरमध्ये पदभार स्वीकारल्यापासून राहुल द्रविडने आयपीएलमधील ब्रेक वगळता, आपल्या साडेनऊ महिन्याच्या कारकिर्दीत पाच मालिकांमध्ये प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावली आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी इंडियन एक्सप्रेसला या निर्णयाची पुष्टी केली. व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय संघासोबत झिम्बाब्वेला जाणार आहे. आम्ही राहुलला काही दिवसांचा ब्रेक (Rahul Dravid on break) देण्याचा निर्णय घेतला आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ 20 ऑगस्ट रोजी प्रवास करणार असल्याने झिम्बाब्वे ते दुबईला जाणे त्याच्यासाठी अशक्य झाले असते. परिणामी लक्ष्मण हे भारतीय संघाचे प्रशिक्षक असतील, असे शाह यांनी या वृत्तपत्राला सांगितले.

लक्ष्मण हे बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख आहेत. लक्ष्मण भारतीय संघासोबत प्रशिक्षक म्हणून प्रवास करण्याची ही पहिलीच वेळ नाही. भारताच्या आयर्लंड दौऱ्यात आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या एका T20 सामन्यादरम्यान तो ड्युटीवर होता. भारतीय संघ बॅक टू बॅक मालिका खेळत असताना, लक्ष्मणचा वापर करण्याच्या या नवीन सूत्रासह बीसीसीआय पुढे जाईल.

कसा असेल झिम्बाब्वे दौरा

भारतीय संघ 18, 20 आणि 22 ऑगस्ट रोजी हरारे येथे तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. बीसीसीआय दुसरी टीम पाठवत आहे, ज्याचे नेतृत्व केएल राहुल करणार आहे. भारतीय बोर्डाच्या वैद्यकीय संघाने त्याला तंदुरुस्त घोषित केले आहे. बीसीसीआयचे सचिव शाह यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने केएल राहुलची फिटनेस टेस्ट केली आहे आणि त्याला झिम्बाब्वेमध्ये आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळण्यास मंजुरी दिली आहे. अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने त्याला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे आणि शिखर धवनला उपकर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.”

राहुल, दीपक हुडा, आवेश खान, अक्षर पटेल यांसारखे खेळाडू तीन एकदिवसीय मालिकेच्या समाप्तीनंतर आशिया कपसाठी भारतीय संघात सामील होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *