27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान UAE मध्ये खेळल्या जाणाऱ्या आशिया कप 2022 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावर विश्रांती दिल्यानंतर नियमित कर्णधार रोहित शर्मा परतला आहे. वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेच्या दुहेरी दौऱ्यांना मुकल्यानंतर विराट कोहलीही परतला आहे. शेवटच्या क्षणी झिम्बाब्वे संघात कर्णधार म्हणून सामील झालेल्या केएल राहुलची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. इशान किशन आणि संजू सॅमसनला जागा नाही, तर श्रेयस अय्यर, दीपक चहर आणि अक्षर पटेल यांना स्टँडबाय म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
आशिया कप 2022 साठी भारताचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान
सामर्थ्य: जबरदस्त फलंदाजी
कागदावर, भारताकडे मजबूत फलंदाजीची फळी आहे, जी कुठल्याही मैदानावर सर्वोत्तम गोलंदाजांशी दोन हात करू शकते. भारताचा कर्णधार रोहितने कर्णधारपद स्वीकारल्यानंतर त्याचा फॉर्म पुन्हा शोधला आहे. त्याने इंग्लंडमध्ये झालेल्या पांढऱ्या चेंडूच्या मालिकेत छाप पाडली आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20I मध्येही त्याने काही चांगल्या खेळी केल्या. सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंतही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.
सूर्यकुमारने इंग्लंडमधील T20I मालिकेदरम्यान शानदार शतक ठोकले आणि वेस्ट इंडिजमधील मालिकेतील तिसऱ्या T20I मध्ये केवळ 44 चेंडूत 76 धावा केल्या. पंतबद्दल सांगायचे तर, त्याने इंग्लंडमध्ये दोन शतके ठोकली, पहिले शतक इंग्लंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात आले तर दुसरे मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथील निर्णायक वन-डे सामन्यात. दिनेश कार्तिकलाही संधी मिळाल्यास तो प्रभाव पाडेल अशी अपेक्षा आहे. आशिया चषकात भारताची फलंदाजी चमकली, तर पुढे येणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतही ते चांगली कामगिरी करू शकतील.
हे ही वाचा: भारताचा T20 विश्वचषक संघ जाहीर
कमतरता: कोहलीच्या फॉर्मबद्दल अनिश्चितता
भारतीय संघात कोणतीही कमतरता जाणवत नसली तरी विराट कोहलीचा फॉर्म नक्कीच मोठा चिंतेचा विषय आहे. भारताच्या माजी कर्णधाराने मागच्या तीन वर्षांत शतक केले नाही आणि त्याचा अलीकडचा फॉर्मही फारसा चांगला नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) साठी खेळतांना ह्या आयपीएलमध्ये त्याने तीन गोल्डन डक नोंदवले आणि इंग्लंड दौऱ्यात सहा आंतरराष्ट्रीय डावांमध्ये त्याची सर्वाधिक धावसंख्या 20 होती. टी-२० विश्वचषक जवळ आल्याने कोहलीला आशिया चषकात चांगली कामगिरी करावीच लागेल. एक चांगली मालिका त्याला त्याचा फॉर्म परत देऊ शकते आणि त्या दृष्टीने त्याच्यासाठी आशिया चषक फार महत्वाचा आहे.
अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनची कामगिरीही महत्वाची असेल. 35 वर्षीय खेळाडूने अलीकडील सामन्यांमध्ये टी-20 फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मात्र, त्याचा या फॉरमॅटमधील एकूण रेकॉर्ड फारसा प्रभावी नाही. युझवेंद्र चहल फिरकीपटू म्हणून भारतीय संघाची पहिली पसंती असला तरी संघातल्या दुसऱ्या फिरकीपटूच्या जागेसाठी आधीच कुलदीप यादव आणि रवी बिश्नोई ह्यांचात चढाओढ आहे. त्यामुळे अश्विनला T20 विश्वचषक संघात स्थान मिळवण्यासाठी आपली दावेदारी मजबूत करावी लागेल.
ह्या खेळाडूंकडे असेल सर्वांचे लक्ष
अर्शदीप सिंग: डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने खेळलेल्या काही खेळांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. सहा T20I मध्ये, त्याने 14.55 च्या सरासरीने आणि 6.33 च्या उत्कृष्ट इकॉनॉमी रेटने नऊ विकेट्स घेतल्या आहेत. हे अजून सुरुवातीचे दिवस आहेत, पण अर्शदीप त्याच्या यॉर्कर आणि वेरिएशनने वेगळा उभा राहिला आहे. त्याचं नियंत्रणही अप्रतिम होतं.
दीपक हुड्डा: चिवट फलंदाज दीपक हुड्डा याने आयर्लंडविरुद्ध दोन धडाकेबाज खेळी करून उत्कृष्ट कामगिरी केली. मात्र, त्यानंतर त्याला लयीसाठी थोडा संघर्ष करावा लागला आहे. हुडाचा फायदा म्हणजे तो ऑफ-स्पिन गोलंदाजीही करू शकतो, त्यामुळे भारतीय संघ त्याच्या कामगिरीवर लक्ष ठेवून असेल.
रवी बिश्नोई: युवा लेग-स्पिनरने वेस्ट इंडिजसाठी मूठभर सिद्ध केले, त्याने तीन T20I मध्ये आठ विकेट्स घेतल्या, ज्यात 16 धावांत 4 विकेट्सचा समावेश आहे. फिरकीपटूंमध्ये मर्यादित स्थानांसाठी भरपूर स्पर्धा असल्याने, रवी बिश्नोईला आशिया कप स्पर्धेत आपली मोहर उमटवायची आहे.