Indian Squad Announced for NZ-BAN Tour: सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये सुरु टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2022) 2022 स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेनंतर नंतर टीम इंडिया न्यूझीलंड आणि बांग्लादेशच्या (Indian Squad Announced for NZ-BAN Tour) दौऱ्यावर जाणार आहे. 18 ते 30 नोव्हेंबर दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध सामने खेळले जातील आणि हा दौरा संपल्यानंतर भारतीय संघ डिसेंबरमध्ये बांग्लादेश दौऱ्यावर जाणार आहे. बांग्लादेशविरुद्ध भारत तीन एकदिवसीय सामने 4, 7 आणि 10 डिसेंबर रोजी खेळणार असून त्यानंतर दोन कसोटी सामने खेळणार आहे. या सामन्यांसाठी बीसीसीआयनं नुकताच संघ जाहीर केला आहे.
Indian Squad Announced: वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती
बीसीसीआयने नुकतीच अधिकृत घोषणा करीत न्यूझीलंड आणि बांग्लादेश दौऱ्यावर जाणाऱ्या (Indian Squad Announced) संघाची माहिती दिली. टी-20 विश्वचषक संपल्यानंतर लगेचच भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. टी-२० संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे देण्यात आले आहे आणि वनडे संघाचे कर्णधारपद शिखर धवनकडे सोपवण्यात आले आहे. तसेच दोन्ही संघाच्या उपकर्णधार पदाची जबाबदारी ऋषभ पंतकडे देण्यात आली आहे.
विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी यांसारखे वरिष्ठ खेळाडू न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघाचा भाग नाहीत. म्हणजेच हे सर्व खेळाडू टी-२० विश्वचषक २०२२ नंतर आपापल्या घरी परततील. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक खेळत आहे, त्यामुळे संघ विश्वचषकानंतर शेजारीच असलेल्या न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यावरून परतल्यानंतर भारताला डिसेंबरमध्ये बांगलादेशचा दौरा करायचा आहे.
हे ही वाचा: मॅच फी बाबत महत्वाची घोषणा
Indian Squad Announced: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ
न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ असा असेल:
भारतीय संघ टी-२० मालिका: हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, के. यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
भारतीय संघ वनडे मालिका: शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
भारत आणि न्यूझीलंड मालिकेचे वेळापत्रक
१८ नोव्हेंबर, शुक्रवार: पहिला टी-२०, वेलिंग्टन
२० नोव्हेंबर, रविवार: दुसरा टी-२०, माउंट मौनगानुई
२२ नोव्हेंबर, मंगळवार: तिसरा टी-२०, ऑकलंड
२५ नोव्हेंबर, शुक्रवार: पहिला वनडे, ऑकलंड
२७ नोव्हेंबर, रविवार: दुसरी वनडे, हॅमिल्टन
३० नोव्हेंबर, बुधवार: तिसरी वनडे, क्राइस्टचर्च
Indian Squad Announced: बांग्लादेश दौऱ्यासाठी भारतीय संघ
भारतीय संघ वनडे मालिका: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल
भारतीय संघ कसोटी मालिका: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.
भारत आणि बांग्लादेश सामन्याचं वेळापत्रक:
4 डिसेंबर, पहिला एकदिवसीय सामना शेर ए बांग्ला, ढाका
7 डिसेंबर, दुसरा एकदिवसीय सामना शेर ए बांग्ला, ढाका
10 डिसेंबर, तिसरा एकदिवसीय सामना शेर ए बांग्ला, ढाका
14 ते 18 डिसेंबर, पहिला कसोटी सामना, झहूर अहमद चौधरी स्टेडियम
22 ते 26 डिसेंबर, दुसरा कसोटी सामना शेर ए बांग्ला, ढाका