Indian Players who got out without scoring in 3 or more matches : केवळ सूर्यकुमार यादवच नाही तर सचिन तेंडुलकरसह हे 6 भारतीयही सलग 3 वनडे सामन्यात शून्यावर झालेत बाद

Indian Players who got out without scoring in 3 or more matches ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार यादवला पुन्हा खातेही उघडता आले नाही. सलग तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार यादव गोल्डन डक मिळवून (पहिल्याच चेंडूवर बाद) बाद झाला. T २० सामन्यांमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार ला एकदिवसीय सामन्यांमध्ये अजून म्हणावे तसे यश मिळालेले नाही. या मालिकेतही सलग तीन सामन्यांत अपयशी ठरल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या वनडे फॉरमॅटमधील निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

तीन वेळा खाते न उघडता बाद झालेला सूर्यकुमार यादव हा पहिला भारतीय क्रिकेटपटू नाही

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग तीन वेळा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतणारा सूर्यकुमार यादव हा पहिला भारतीय क्रिकेटपटू नाही. या यादीत महान सचिन तेंडुलकरच्या नावाचाही समावेश आहे. चला जाणून घेऊया अशा भारतीय क्रिकेटपटूंबद्दल जे सलग तीन एकदिवसीय सामन्यात शून्यावर बाद झाले.

हे ही वाचा: एकदिवसीय विश्वचषक 2023 वेळापत्रक घोषित

सचिन तेंडुलकर :

सचिन तेंडुलकरला पहिले एकदिवसीय शतक झळकावण्यासाठी 78 सामने आणि जवळपास 5 वर्षे वाट पाहावी लागली. सचिन तेंडुलकरने नोव्हेंबर 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

सचिनने 9 सप्टेंबर 1994 रोजी कोलंबो येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिले एकदिवसीय शतक (110 धावा) झळकावले. विशेष म्हणजे पुढच्या तीन डावात तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. फरक एवढाच की तो तीनही वेळा गोल्डन डक बनला नाही.

अनिल कुंबळे :

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षक असलेला अनिल कुंबळे 1996 मध्ये सलग तीन सामन्यांत शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. अनिल कुंबळे मे १९९६ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये शून्यावर बाद झाला होता. 6 सप्टेंबर 1996 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्याला एकही धाव करता आली नाही. मे ते 6 सप्टेंबर दरम्यान त्याने आणखी तीन एकदिवसीय सामने खेळले, परंतु त्यापैकी एकाही सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.

झहीर खान :

झहीर खान नोव्हेंबर 2003 ते मार्च 2004 दरम्यान सलग तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये शून्यावर बाद झाला. झहीर खान 18 नोव्हेंबर 2003 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात शून्यावर बाद झाला. यानंतर, 2004 मध्ये, तो पाकिस्तानमध्ये सलग दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये शून्यावर बाद झाला.

इशांत शर्मा :

इशांत शर्मा ऑगस्ट 2010 ते जून 2011 दरम्यान सलग तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. 28 ऑगस्ट 2010 रोजी श्रीलंकेविरुद्ध इशांत शर्मा शून्यावर बाद झाला. यानंतर, 13 जून आणि 16 जून 2011 रोजी, तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडेमध्ये शून्यावर बाद झाला.

जसप्रीत बुमराह:

जसप्रीत बुमराह 2017 ते मार्च 2019 दरम्यान सलग तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये शून्यावर बाद झाला. या काळात त्याने श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया या संघांविरुद्ध खेळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *