India reach WTC final: क्राइस्टचर्चमध्ये न्यूझीलंडने श्रीलंकेवर शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक विजय मिळवला आणि दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आघाडी घेतली. न्यूझीलंडच्या या विजयानंतर, भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 फायनलमध्ये (India reach WTC final) आपले स्थान निश्चित केले आहे. आता भारतीय संघ 7 जूनपासून लंडनमधील ओव्हल येथे विजेतेपदासाठी ऑस्ट्रेलिया संघाशी दोन हात करेल. भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा डब्ल्यूटीसी फायनलिस्ट बनला आहे. मागच्या टेस्ट चॅम्पिअनशिप फायनल मध्ये न्यूझीलंडने भारताला केले होते.
India reach WTC final: श्रीलंका आणि भारत या संघांमध्ये चुरस
ऑस्ट्रेलिया आधीच या फायनल साठी पात्र ठरली आहे आणि उरलेल्या जागेसाठी श्रीलंका आणि भारत या संघांमध्ये चुरस होती. सध्या अहमदाबादमध्ये सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटीत, भारताला विजय आवश्यक होता. भारताचा पराभव झाला किंवा सामना अनिर्णित राहिला तर श्रीलंकेकडे संधी होती परंतु त्यासाठी त्यांना न्यूझीलंडविरुद्ध दोन्हीही कसोटी सामन्यात विजय आवश्यक होता. पहिल्या दोन दिवसांत भारताने केलेली सुरुवात आणि ख्राईस्टचर्च कसोटीमध्ये त्यांचे स्वतःचे वर्चस्व यामुळे त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या पण फायनलमध्ये प्रवेश करण्याचे त्यांचे स्वप्न 5 व्या दिवशी शेवटच्या चेंडूवर झालेल्या पराभवामुळे भंगले आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारताचा प्रवेश (India reach WTC final) निश्चित झाला.
हे ही वाचा: धावांचा डोंगर रचत संपवला कसोटी शतकांचा दुष्काळ
India reach WTC final: असा होता भारताचा WTC फायनल पर्यंतचा प्रवास
डब्ल्यूटीसीच्या या दुसऱ्या चक्रातील भारताचा प्रवास कोहली-शास्त्री यांच्या कारकिर्दीत ऑगस्ट-सप्टेंबर 2021 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी मालिकेने सुरू झाला. त्यांनी लंडनमधील त्यांचे दोन्ही सामने जिंकले आणि कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे 2-1 ने मालिकेत आघाडी घेतली. पाचवी कसोटी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली गेली. शास्त्री यांची जागा राहुल द्रविडने घेतली आणि पुढे न्यूझीलंड विरुद्ध दोन सामन्यांची होम सीरिज झाली ज्यात कानपूरमधील सामना अनिर्णित राहिल्यानंतर मुंबईतील विजयासह भारताने ती मालिका जिंकली.
दक्षिण आफ्रिकेचा मालिका विजय
त्यानंतर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा झाला. केएल राहुलचे पहिल्या डावातील शतक आणि दमदार गोलंदाजीमुळे भारताने सेंच्युरियनमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली होती, परंतु त्यानंतर भारताच्या सामान्य फलंदाजीच्या कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेला जोहान्सबर्ग येथे मालिकेत बरोबरी साधता आली. डीन एल्गरच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला केप टाऊन मध्येही विजय मिळवून दिला आणि कोहलीच्या आशा धुळीस मिळवून मालिका विजय पूर्ण केला.
श्रीलंकेविरुद्ध मालिका विजय, इंग्लंड विरुद्ध बरोबरी
भारताची मार्चमध्ये श्रीलंकेविरुद्धची मायदेशातील मालिका रोहित शर्माची कायमस्वरूपी कसोटी कर्णधार म्हणून पहिली होती. त्याने संघाला 2-0 च्या फरकाने जोरदार मालिका विजय मिळवून दिला. या मालिकेत रवींद्र जडेजाने पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 175 धावा केल्या आणि एक फायफर घेतला तर जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यरने दुसऱ्या डावात प्रभावित केले.आयपीएलनंतर, जुलैमध्ये, भारताने पुढे ढकलण्यात आलेली पाचवी कसोटी इंग्लंडमध्ये खेळली पण जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांच्या शतकांच्या जोरावर इंग्लंडने चौथ्या डावात आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. आणि ती मालिका बरोबरीत सुटली.
बांगलादेशवर दणदणीत विजय
भारताने 2022 मध्ये बांगलादेशवर 2-0 असा दणदणीत विजय मिळवून फायनल मध्ये पात्र होण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले. या मालिकेत शुभमन गिलने आपले पहिले कसोटी शतक झळकावले आणि कुलदीप यादवने दोन्ही डावात आठ बळी घेत भारताच्या 188 धावांनी विजय मिळवला. या मालिकेतील विकेट्सच्या यादीत अव्वल स्थानावर असलेल्या मेहदी हसनने दुसऱ्या सामन्यात बांगलादेशसाठी मालिका बरोबरी साधण्याची संधी निर्माण केली. भारताला विजयासाठी अवघ्या 145 धावा हव्या होत्या पण 7 बाद 74 अशी त्यांची अवस्था झाली होती. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि आर अश्विन यांनी चिवट फलंदाजी करत बांगलादेशच्या विजयाच्या शा धुळीस मिळवल्या.
India reach WTC final: बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली
भारताने 2023 ची सुरुवात नागपूर आणि दिल्ली येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवून केली आणि WTC फायनलमध्ये जाण्याच्या दिशेने मोठी पावले उचलली. पाहुण्यांचा संघ भारतीय फिरकीचा सामना करू शकला नाही. पण पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथच्या ऑस्ट्रेलियाने इंदूरमध्ये जोरदार पलटवार केला आणि सामना जिंकला. चौथ्या कसोटीत फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर दोन्हीही संघानी पहिल्या डावात धावांचे डोंगर रचले आणि सामना अनिर्णित राहिला.
ख्राईस्टचर्चमध्ये पावसाने शेवटच्या दिवसाचा जवळपास अर्धा भाग वाया घालवला आणि उरलेल्या वेळात न्यूझीलंडने पडझड होऊनही अंतिम चेंडूवर लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला आणि भारताच्या पात्रतेचा मार्ग मोकळा केला.