India In Academy Awards 2023 : अकॅडेमी अवॉर्ड्स २०२३ मध्ये भारतीयांचा डंका

India In Academy Awards 2023 : १२ मार्च २०२३ हा दिवस भारतीयांसाठी अत्यंत आनंदाचा ठरला आहे. ऑस्कर २०२३ मध्ये एसएस राजामौली यांच्या ‘RRR’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्कर मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार या गाण्याला मिळाला. तर दुसरीकडे, ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ने सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म विभागात बाजी मारली. दोन्ही सिनेमांच्या यशाचे पडसाद सोशल मीडियावर दिसत आहेत. सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

India In Academy Awards 2023 : Best Original Song ‘नाटू-नाटू’

अमेरिकेत पार पडलेल्या ऑस्कर पुरस्कार 2023 या पुरस्कार सोहळ्यात भारताच्या ४ कलाकृतींना नामांकन मिळाले होते त्यापैकी आर आर आर या सिनेमातील ‘नाटू-नाटू’ या गाण्याने Best Original Song म्हणजेच ‘सर्वोत्कृष्ट मूळ गाणे’ या श्रेणीत हॉलिवूडचा सर्वात मोठा सन्मान ‘ऑस्कर 2023’ पुरस्कार जिंकला आहे. 95 व्या अकादमी अवॉर्डमध्ये Best Original Song या श्रेणीत ‘नाटू-नाटू’ गाण्याचा मुकाबला टेल इट लाइक अ वुमन, होल्ड माय हँड फ्रॉम टॉप गन: मॅव्हरिक, लिफ्ट माय अप फ्रॉम ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर, आणि धिस इज ए लाइफ फ्रॉम एव्हरीथिंग, एव्हरीव्हेअर, ऑल अॅट वन्स या गाण्यांशी होता. ‘नाटू-नाटू’च्या या यशामागे एमएम कीरवाणी यांचा हात आहे.

हे ही वाचा: ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ सोहळा मुंबईत संपन्न

‘India In Academy Awards 2023 : ‘नाटू-नाटू’ ला स्टॅण्डिंग ओवेशन

ऑस्कर सोहळ्यात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्यावर लाइव्ह परफॉर्मन्स होता. डॉल्बी थिएटरमध्ये उपस्थितांनी गायक काळ भैरवचा धमाकेदार परफॉर्मन्स पाहिल्यानंतर त्यांना स्टॅण्डिंग ओवेशन दिले.

India In Academy Awards 2023 : दीपिका पादुकोणला प्रेझेंटर म्हणून मान

ऑस्कर 2023 आणखी एका कारणासाठी भारतासाठी खूप खास ठरला आहे. कारण यावर्षी ऑस्कर्समध्ये दीपिका पादुकोणला प्रेझेंटर म्हणून मान मिळाला. दीपिकाने ऑस्कर २०२३ च्या मंचावरून भाषण केले. ती RRR चित्रपटातील नाटू नाटू गाण्याबद्दल बोलत होती आणि यासंदर्भातली माहिती देत होती. पण, मध्येच टाळ्यांच्या आवाजामुळे आणि लोकांच्या सकारात्मक प्रतिक्रियांमुळे दीपिकाला भाषणात पुन्हा पुन्हा थांबावे लागत होते. ‘नाटू नाटू’ गाण्याच्या प्रस्तावनेसाठी तिला उपस्थितांची ज्या प्रकारे साथ मिळत होती, ते पाहून प्रत्येक भारतीय सुखावला असेल यात काही शंका नाही. विशेष म्हणजे तो आनंद दीपिकाच्या चेहऱ्यावरही स्पष्ट दिसत होता. यावेळी दीपिकाच्या लुकने तर सर्वांचे लक्ष वेधलेच पण त्याहीपेक्षा तिच्या नेक टॅटूनेही लक्ष वेधल्याचे दिसून आले आहे.

India In Academy Awards 2023 : सर्वोत्कृष्ट लघुपट ‘द एलिफंट व्हिस्पर्स’

सर्वोत्कृष्ट लघुपटांच्या श्रेणीत निर्माते गुनीत मोंगा यांच्या ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ या माहितीपटालाही पुरस्कार मिळाला. ‘द एलिफंट व्हिस्परर’ हा नेटफ्लिक्सचा माहितीपट आहे. याचे दिग्दर्शन कार्तिकी गोन्साल्विस यांनी केले असून गुनीत मोंगा यांनी निर्मिती केली आहे. या लघुपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर, हा दक्षिणेतील बोमन आणि बेबी एलिफंट नावाच्या बेली आणि रघु या जोडप्याभोवती फिरतो. एका अनाथ हत्तीची काळजी घेण्यासाठी, एक कुटुंब तयार करण्यासाठी एक जोडपे आपले जीवन कसे समर्पित करते हे या कथेत दाखवण्यात आले आहे.

India In Academy Awards 2023 : नामांकन मिळूनही पुरस्कार न जिंकू शकलेल्या भारतीय कलाकृती

सर्वोत्कृष्ट माहितीपटांच्या श्रेणीत नामांकन मिळवलेल्या ‘ऑल दॅट ब्रीद’, हा माहितीपट पुरस्कार जिंकू शकला नाही. हा पुरस्कार ‘नवलनी’ या माहितीपटाच्या जिंकला आहे. शौनक सेनचा ऑल द ब्रेथ बहार हो गई हा चित्रपट नदीम आणि सौद या दोन दिल्लीच्या भावांबद्दल आहे, जे शहराच्या खराब होत असलेल्या हवेत स्थलांतरित काळ्या घारींना वाचवण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे, ज्याबद्दल कोणालाही माहिती नाही.

तसेच ऑस्कर 2023 साठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर चित्रपट श्रेणीत भारतातर्फे अधिकृतपणे पाठवल्या गेलेल्या गुजराती चित्रपट ‘चेल्लो शो’ ला ही फारसा प्रभाव पाडता आला नाही. हा चित्रपट पहिल्या फेरीतच बाहेर पडला आहे. हा पुरस्कार ‘ऑल क्वाईट ऍट वेस्टर्न फ्रंट’ या जर्मन चित्रपटाने जिंकला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *