fbpx

ICC World Test Championship: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप : भारताची दावेदारी मजबूत

ICC World Test Championship: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारतीय संघाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) फायनल खेळणे जवळपास निश्चित झाले आहे. आतापर्यंत मजबूत स्थितीत असलेल्या ऑस्ट्रेलिया संघच कदाचित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीतून बाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जाणून घेऊया भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल पर्यंत पोहोचण्याचे संपूर्ण समीकरण कसे असेल.

दक्षिण आफ्रिका भारताच्या पुढे जाऊ शकत नाही

ICC World Test Championship पॉइंट टेबलमध्ये सध्या ऑस्ट्रेलिया पहिल्या, भारत दुसऱ्या, श्रीलंका तिसऱ्या आणि दक्षिण आफ्रिका चौथ्या क्रमांकावर आहे. दिल्लीतील दुसऱ्या कसोटीच्या निकालामुळे अंतिम फेरीच्या शर्यतीतून दक्षिण आफ्रिका बाहेर पडला आहे. टॉप-२ मध्ये पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या टक्केवारीपासून तो खूपच लांब गेला आहे.  दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध आणखी दोन सामने खेळायचे आहेत. जर आफ्रिकन संघाने हे दोन्ही सामने जिंकले तर त्याचे 55.55% गुण होतील.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सध्याच्या मालिकेत भारतीय संघाने उर्वरित दोन सामने गमावले तरी त्यांचे 56.94% गुण असतील. आता दक्षिण आफ्रिकेचा संघ कोणत्याही परिस्थितीत भारताला मागे टाकू शकत नाही.

हे ही वाचा: पाकिस्तान दिवाळखोरीच्या वाटेवर

श्रीलंकेला न्यूझीलंड कसोटी सामने

सध्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंकेच्या संघाला न्यूझीलंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. श्रीलंकेचा संघ दोन्ही कसोटी सामने जिंकू शकला नाही, तर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन कसोटी जिंकूनच अंतिम फेरीत पोहोचेल. श्रीलंकेने क्लीन स्वीप केल्यास त्याचे 61.11% गुण होतील. या स्थितीत ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या मालिकेत भारताला आणखी एक कसोटी जिंकावी लागणार आहे.

मात्र, न्यूझीलंडमधील दोन्ही कसोटी जिंकणे श्रीलंकेसाठी खूप कठीण आहे. श्रीलंकेचा संघ तेथे एकही कसोटी हरला किंवा एकही सामना अनिर्णित राहिला, तर भारत केवळ ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन कसोटी जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करेल.

ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामना खेळणे जवळपास निश्चित

ऑस्ट्रेलियाचे ICC World Test Championship फायनल खेळणे जवळपास निश्चित झाले आहे. तिने या मालिकेतील चारही सामने गमावले तरी त्यांना टॉप-2 मध्ये स्थान मिळू शकते . मात्र, यासाठी त्याला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागू शकते. टीम इंडियाने जर ही मालिका ४-० अशा फरकाने जिंकली तर ऑस्ट्रेलियावर मोठं संकट नक्कीच येऊ शकतं. कारण गुणतालिकेत त्यांचे पॉईंट्स कमी होत ते खाली घसरू शकतात आणि त्यांना अंतिम फेरीत जागा निश्चित करण्यासाठी श्रीलंका-न्यूझीलंड मधील कसोटी मालिकेच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. श्रीलंकेने जर ही कसोटी मालिका एकतर्फी जिंकली तरच ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीच्या रेसमधून बाहेर जाईल आणि अंतिम सामना भारत आणि श्रीलंकेत होईल. पण घरच्या मैदानावर न्यूझीलंड संघाला हरवणे सोपे नाही. भारताने चारीही कसोटी सामने जिंकले आणि श्रीलंकेने न्यूझीलंड विरुद्ध दोन्हीही कसोटी सामने जिंकले तरच पॉईंट्स टेबलवर काही उलटफेर होऊ शकतो अन्यथा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) फायनल भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघच खेळतील हे निश्चित. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचे भवितव्य त्यांच्याच हातात आहे पण श्रीलंकेला मात्र भारताच्या विजयाचाच आधार आहे. उर्वरित दोन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने एक सामना अनिर्णित ठेवला तरीही ते फायनल सामन्यासाठी पात्र होतील.

ICC World Test Championship: ओव्हल येथे होणार अंतिम सामना

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनच्या ओव्हल क्रिकेट मैदानावर 7 ते 11 जून दरम्यान होणार आहे. बुधवारी तारखांची घोषणा करताना ICC ने सांगितले की, सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. 12 जून हा राखीव दिवस असेल.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा (ICC World Test Championship) हा दुसरा हंगाम आहे. पहिल्या सत्रात न्यूझीलंड संघ केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन बनला होता. साउथॅम्प्टनमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात किवी संघाने भारताचा 8 विकेट्स राखून पराभव केला.

तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर १ होण्याची संधी

भारतीय संघ आता क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर १ बनण्याच्या अगदी जवळ आला आहे. सध्या टीम इंडिया वनडे आणि टी-20 मध्ये नंबर-1 आहे तर टेस्टमध्ये नंबर दोनवर आहे. भारतीय संघाने ही मालिका 2-0 ने जिंकली किंवा मोठ्या फरकाने जिंकली तर ते कसोटीतही नंबर-1 बनेल.

म्हणजेच या मालिकेनंतर कसोटीत सर्वोत्तम होण्यासाठी भारताला एकतर एक सामना जिंकावा लागेल किंवा दोन्ही सामने अनिर्णित ठेवावे लागतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *