fbpx

Historic Win Of Ecuador on Qatar: इक्वेडोरची ऐतिहासिक सुरुवात! कतारला हरवून केला ‘हा’ मोठा विक्रम

Historic Win Of Ecuador: सलामीच्या लढतीत इक्वेडोरने यजमान कतारवर विजय मिळवत ९२ वर्षांनंतर एक मोठा विक्रम मोडीत काढला आहे.

Historic Win Of Ecuador on Qatar: इक्वेडोरची दमदार सुरवात

इक्वेडोर संघाने फिफा विश्वचषक २०२२ चा पहिला सामना जिंकत दमदार सुरवात केली आहे. आघाडीपटू एनर व्हेलेंसियाने झळकावलेल्या दोन गोलच्या बळावर विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत इक्वेडोरने रविवारी यजमान कतारवर २-० असा विजय इक्वेडोरने रविवारी यजमान कतारवर २-० असा विजय मिळवला. विश्वचषक स्पर्धेत यजमान संघ उद्घाटनीय सामन्यात पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ होती.

Historic Win Of Ecuador on Qatar: इक्वेडोरचे वर्चस्व

इक्वेडोरने सामन्याच्या सुरुवातीपासूनच नियंत्रण मिळवत कतारच्या बचाव फळीवर दडपण आणले. तिसऱ्या मिनिटाला व्हेलेंसियाने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र, पंचांनी ‘ऑफसाइड’चा इशारा केल्याने तो गोल अवैध ठरवण्यात आला. यानंतरही इक्वेडोरच्या खेळाडूंचे कतारवर आक्रमण सुरू होते. १६व्या मिनिटाला पेनल्टीच्या साहाय्याने व्हेलेंसियाने गोल झळकावत इक्वेडोरला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर व्हेलेंसियाने (३१व्या मि.) पुन्हा एकदा पुढाकार घेत हेडरच्या मदतीने अप्रतिम गोल करत इक्वेडोरला २-० अशा मजबूत स्थितीत पोहोचवले. इक्वेडोरने मध्यंतरापर्यंत ही आघाडी कायम ठेवली होती. दुसऱ्या सत्रात कतारकडून आघाडी कमी करण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, त्यांना यश मिळाले नाही.

अ गटात यजमान कतारविरुद्ध २-० असा विजय मिळवून दक्षिण अमेरिकन राष्ट्राने स्पर्धेतील पहिले गुण मिळवले. इक्वेडोरचा फॉरवर्ड एनर व्हॅलेन्सियाने सामन्यातील दोन्ही गोल केले. यासह कतार हा यजमान म्हणून पहिला सामना गमावणारा फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासातील पहिला देश ठरला आहे. स्पर्धेच्या ९२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच यजमान देशाला सलामीचा सामना गमवावा लागला आहे.

या विजयानंतर स्टेडियम मध्ये इक्वेडोर आणि कतारच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झालेली दिसून आली.

हे ही वाचा: FIFA विश्वचषक 2022 वेळापत्रक आणि माहिती

एनर व्हॅलेन्सियाची चमकदार कामगिरी

सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला इक्वेडोरने कतारच्या पोस्टमध्ये गोल केला, पण व्हीएआरने तो फेटाळला. यानंतर १६व्या मिनिटाला एनर व्हॅलेन्सियाने पेनल्टीद्वारे स्पर्धेतील पहिला गोल केला. ३१व्या मिनिटाला व्हॅलेन्सियाने आणखी एक गोल करून इक्वेडोरला विजय मिळवून दिला. अ गटात नेदरलँड आणि सेनेगल या संघांचाही समावेश आहे. या विजयासह इक्वेडोरला अंतिम १६ मध्ये पोहोचण्याची चांगली संधी आहे.

विश्वचषकातली इक्वेडोरची कामगिरी

कतार आपला पहिला विश्वचषक खेळत आहे आणि इक्वेडोरचा संघही विश्वचषकात फारसा जुना नाही. संघाने मागील फुटबॉल विश्वचषकासाठी प्रथमच पात्रता मिळवली आणि मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळवले आणि नंतर गट टप्प्यातच बाहेर पडले. २००६ च्या विश्वचषकात, संघ केवळ पात्र ठरला नाही तर गट फेरीत पोलंड आणि कोस्टा रिकासारख्या संघांना पराभूत करून बाद फेरीत प्रवेश केला. विश्वचषकाच्या इतिहासात इक्वेडोरची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. त्यानंतर इंग्लंडकडून १-० ने पराभूत झाल्यानंतर इक्वेडोरला राऊंड ऑफ १६ मधून बाहेर केले.

२०१२ साली संघ पुन्हा एकदा विश्वचषकासाठी पात्र ठरला. त्यानंतर संघ आपल्या गटात तिसरा क्रमांक मिळवला आणि पुढे प्रगती करू शकला नाही. २०१८ मध्ये, इक्वेडोरने विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र होण्याची संधी गमावली आणि आता संघ पुन्हा एकदा विश्वचषक खेळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *