GoFirst Bankruptcy : ‘गो फर्स्ट’ विमान कंपनीचा पूर्वकल्पना न देता दिवाळखोरीसाठी अर्ज

GoFirst Bankruptcy : बजेट एअरलाइन गो फर्स्टने अचानक दिवाळखोरी संरक्षणासाठी अर्ज केला आणि काही दिवसांसाठी त्यांची उड्डाणे रद्द केली. एअरलाइनने ग्राहकांना परतावा देण्याचे आश्वासन दिले आहे पण त्याचा त्रास मात्र त्यांच्या कर्मचाऱ्यांना होत आहे जे सध्या संतप्त प्रवाशानीचे कॉल घेण्यात व्यस्त आहेत. सध्या १२ मेपर्यंत गो फस्र्टची विमानसेवा बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, यापुढेही ही विमानसेवा बंद राहण्याची शक्यता आहे.

GoFirst Bankruptcy : पूर्वकल्पना न देता दिवाळखोरीसाठी अर्ज

‘गो फर्स्ट’ एअरलाइनने दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे. याचबरोबर कंपनीने पूर्वकल्पना न देता विमान सेवा अचानक बंद केली आहे. याचा फटका पर्यटक आणि त्यांना सेवा पुरवणाऱ्या पर्यटन कंपन्यांना बसला आहे. याबाबत देशभरातील पर्यटन कंपन्यांच्या शिखर संघटनेने सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.

हे ही वाचा: आधार कार्डला झाले 10 वर्षे? विनामूल्य करा माहिती अपडेट

संघटनेच्या मागण्या

  • ‘गो फर्स्ट’च्या या हंगामातील मार्गावर इतर कंपन्यांना सेवा देण्याचे आदेश द्यावेत.
  • पुढील दोन महिने विमान तिकिटांच्या किमतीवर मर्यादा आणून प्रवाशांची लूट टाळावी.
  • ‘गो फर्स्ट’ने तिकिटाचा परतावा थेट आभासी खात्यात न देता थेट पर्यटन कंपन्यांच्या बँक खात्यात द्यावा. * सहल रद्द झाल्यास पर्यटन कंपन्यांना परतावा देण्याचे हॉटेल व इतर सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांना निर्देश द्यावेत.

टॅपने मांडली भूमिका

ट्रॅव्हल एजंट्स असोसिशन पुणे (टॅप) या पर्यटन कंपन्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन याबाबत भूमिका मांडली. संघटनेचे अध्यक्ष दीपक पुजारी म्हणाले की, पर्यटन व्यवसाय करोना महासाथीमुळे दीर्घकाळ बंद होता. आता कुठे तो पूर्वपदावर येत होता. अनेक जणांनी काही महिन्यांपूर्वी या हंगामातील पर्यटनाच्या योजना आखल्या होत्या. अचानक गो फस्र्टने सेवा बंद केल्याने पर्यटक आणि पर्यटन संस्थांना फटका बसला आहे. याबाबत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडे शिखर संघटनेने दाद मागितली आहे.

पर्यटन व्यवसायाला फटका

पर्यटन संस्थांकडून उन्हाळी पर्यटनाचे नियोजन हे सहा महिने आधी केले जाते. त्यासाठी विमान कंपन्या, हॉटेल, स्थानिक सेवा यांसह इतर गोष्टींवर आगाऊ परत न मिळण्यायोग्य पैसे दिले जातात. अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे चूक नसतानाही पर्यटन कंपन्यांना पर्यटकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. याचवेळी विमान कंपन्यांकडून पर्यटकांची दिशाभूल केली जात आहे. तिकिटांचा परतावा ग्राहकाला कंपनीच्याच आभासी खात्यात दिला असून, तो कंपनीची तिकिटे पुन्हा खरेदी करण्यासाठी वापरता येतो. विमान कंपनी बंद पडली तर तिची तिकिटे कशी खरेदी करता येतील, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

‘गो फर्स्ट’चे म्हणणे

कार्मिक कारणांमुळे १२ मे २०२३ पर्यंतची गो फस्र्टची उड्डाणे रद्द केली आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबाबत दिलगीर आहोत. उड्डाणे रद्द करण्यात आल्याने प्रवाशांच्या प्रवास नियोजनावर परिणाम झाला आहे. त्याची भरपाई करण्यासाठी सर्व प्रकारचे सहाय्य करण्यास तयार आहोत. प्रवाशांना मूळ पेमेंट मोडद्वारे रकमेचा पूर्ण परतावा देण्यात येत आहे. प्रवाशांना काही अडचण असल्यास ग्राहक क्रमांकाशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *