fbpx

Gadar 2 Gets UA Certificate : ‘गदर 2’ मध्ये सेन्सॉर बोर्डाने केले मोठे बदल, 10 कट्सनंतर मिळाले UA प्रमाणपत्र

Gadar 2 Gets UA Certificate : सनी देओलचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘गदर 2’ प्रदर्शित होण्यापूर्वीच सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील 10 संवाद कापले आहेत. वंदे महाराष्ट्र (Vande Maharashtra) ला मिळालेल्या माहिती नुसार, सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने ‘गदर 2’ चित्रपटात 10 मोठे बदल करण्यास सांगितले आहे. वृत्तानुसार, दंगलीदरम्यान दंगलखोरांनी लावलेल्या ‘हर हर महादेव’च्या घोषणाही चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.

Gadar 2 Gets UA Certificate : 11 ऑगस्टला होणार रिलीज

सनी देओलचा आगामी चित्रपट ‘गदर 2’ लवकरच रिलीज होणार आहे. या अभिनेत्याचे चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेकडे लक्ष ठेवून आहेत. या चित्रपटाबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. ‘गदर 2’ हा चित्रपट 11 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार असून त्याच दिवशी रिलीज होणाऱ्या अक्षय कुमारच्या ‘OMG 2 ‘शी या चित्रपटाचा थेट सामना होणार आहे.

एकीकडे सेन्सॉर बोर्डाने अक्षय कुमारीच्या ‘ओएमजी २’मध्ये अनेक बदल केले असून त्यानंतरही या चित्रपटाला ‘ए’ प्रमाणपत्र देण्यात आले आहे, तर दुसरीकडे सनी देओलच्या ‘गदर २’ मध्येही सेन्सॉर बोर्डाने अनेक बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या चित्रपटाला ‘यूए’ प्रमाणपत्र (Gadar 2 Gets UA Certificate) मिळाले असले तरी त्यात दहा बदल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

दंगलीच्या दृश्यांमध्ये केलेले बदल

सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने सनी देओलच्या ‘गदर 2’ चित्रपटावर कात्री चालवताना 10 मोठे बदल करण्यास सांगितले आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, दंगलीच्या वेळी दंगलखोरांनी लावलेल्या ‘हर हर महादेव’च्या घोषणा चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. यासोबतच चित्रपटाच्या उपशीर्षकांमध्ये या घोषणांना स्थान देऊ नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. याशिवाय चित्रपटात ‘तिरंगा’ ऐवजी ‘झंडा’ हा शब्द वापरण्यात आल्याचीही चर्चा आहे, यासंबंधीचा एक संवादही बदलण्यात आला आहे.

हे ही वाचा : कुठलीही कात्री न लावता प्रदर्शित होणार

‘शिव तांडव’ स्तोत्रातील श्लोकाच्या वापरावरही आक्षेप

चित्रपटातील वेश्यालयाच्या पार्श्वभूमीवर ठुमरी सादर करण्यात आली आहे ज्याचे शब्द काहीसे असे आहेत – ‘बता दे सखी… गये शाम’. या ठुमरीतही बदल करण्यात आले आहेत. त्याऐवजी ‘बता दे पिया कहाँ बिताई शाम…’ केले आहे. कुराण आणि गीतेच्या संदर्भात चित्रपटात एक संवाद आहे, त्यातही बदल करण्यात आल्याची बाब समोर येत आहे. याशिवाय सेन्सॉर बोर्डाने ‘गदर 2’ च्या शेवटी दंगलीच्या वेळी ‘शिव तांडव’ मधील श्लोक आणि शिवमंत्रांचा जप काढून टाकावा आणि इतर काही सामान्य संगीत लावण्याची सूचना केली आहे.

मंत्रांच्या भाषांतराच्या प्रती जमा करण्याच्या सूचना

या सर्व बदलांशिवाय सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना चित्रपटात वापरण्यात आलेल्या सर्व श्लोक आणि मंत्रांच्या अनुवादाच्या प्रती जमा करण्याच्या सक्त सूचना दिल्याचेही बोलले जात आहे. ‘गदर 2’ मध्ये सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान अनेक गोष्टी सांगून कागदोपत्री पुरावे सादर करण्यास सांगितले आहे.

अनिल शर्मा दिग्दर्शित गदर २ या चित्रपटात १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाचा काळ दाखवण्यात आला आहे. चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर, सनी देओलशिवाय या चित्रपटात अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सध्या ‘गदर 2’ आणि ‘ओह माय गॉड 2’ या दोन मोठ्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर 11 ऑगस्टला जोरदार टक्कर होणार आहे. अशा परिस्थितीत कोण बाजी मारतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *