Fortune Global 500 List : २०२२-२३ या आर्थिक वर्षीची फॉर्च्यून ग्लोबल 500 यादी नुकतीच प्रकाशित करण्यात आली. या यादीत 8 भारतीय कंपन्यांनी स्थान मिळविले आहे.
Fortune Global 500 List : वॉलमार्ट पहिल्या स्थानावर
वंदे महाराष्ट्र (Vande Maharashtra) ला मिळालेल्या माहिती नुसार, फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीतील कंपन्यांची निवड मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षातील त्यांच्या एकूण कमाईच्या आधारे केली जाते. वॉलमार्ट फॉर्च्युन ग्लोबल 500 यादीत(Fortune Global 500 List) पहिल्या स्थानावर आहे, त्यानंतर सौदी अरामको, स्टेट ग्रिड, ऍमेझॉन आणि चायना नॅशनल पेट्रोलियम यांचा क्रमांक लागतो. सिनोपेक ग्रुप, एक्सॉन मोबिल, ऍपल, शेल आणि युनायटेडहेल्थ ग्रुप या टॉप 10 मधील इतर कंपन्या आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीजचा नवा विक्रम
भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने नवा विक्रम केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीत पहिल्या 100 मध्ये स्थान मिळवले आहे. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज आता 88 व्या स्थानावर आली आहे. ही कामगिरी करत रिलायन्सने 16 स्थानांची झेप घेतली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज 2022 मध्ये फॉर्च्यून ग्लोबल 500 च्या यादीत 104 व्या क्रमांकावर होती.
या यादीत टाटा मोटर्स आणि राजेश एक्सपोर्ट या दोन अन्य भारतीय कंपन्यांचाही समावेश आहे. टाटा मोटर्सने 33 स्थानांनी सुधारणा करत 337 व्या स्थानावर, तर राजेश एक्सपोर्ट्सने 84 स्थानांनी झेप घेत 353 व्या क्रमांक प्राप्त केला आहे.
हे ही वाचा : लॅपटॉप, टॅबलेट आयातीवर निर्बंध
आयओसी टॉप 100 मध्ये
भारतीय सरकारी तेल विपणन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने देखील या यादीत पहिल्या 100 मध्ये प्रवेश केला आहे. कंपनीने 94 वे स्थान पटकावले आहे. आयओसीने हे स्थान मिळवण्यासाठी 48 स्थानांची झेप घेतली आहे.
दोन वर्षात 67 स्थानांची झेप
रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या दोन वर्षांत फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीत 67 स्थानांची प्रगती केली आहे. रिलायन्स 2021 मध्ये या यादीत 155 व्या स्थानावर होती. रिलायन्स इंडस्ट्रीजने या फॉर्च्युन ग्लोबल लिस्टमध्ये सलग 20 वर्षे आपले स्थान कायम ठेवले आहे. या यादीत भारतातील कोणत्याही खाजगी क्षेत्रातील कंपनीचा हा सर्वात जास्त काळ मुक्काम आहे.
यादीत इतर कोणत्या कंपन्यां?
भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) यावर्षी फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीत 9 स्थानांनी घसरून 107 व्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) या यादीत 158 व्या स्थानावर आहे. या यादीत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) चे रँकिंग 233 व्या स्थानावर आहे. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीत 235 व्या स्थानावर आहे. या फॉर्च्युन ग्लोबल 500 यादीत टाटा मोटर्स 337 व्या स्थानावर असूनआणि यासाठी कंपनीने 33 स्थानांची झेप घेतली आहे. या यादीत राजेश एक्सपोर्ट्सने 83 स्थानांची प्रगती करत 353 वे स्थान मिळविले आहे.