fbpx

FIFA World Cup 2022- Now Japan stuns Germany: जपानची बलाढ्य जर्मनीवर मात

FIFA World Cup 2022- Now Japan stuns Germany: कतारमध्ये सुरु असलेली FIFA विश्वचषक 2022 ही अपसेटची स्पर्धा ठरत आहे. अर्जेंटिनाला मंगळवारी सौदी अरेबियाकडून धक्का बसल्यानंतर, बुधवारी खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ई गटातील पहिल्या सामन्यात जपानने चार वेळा चॅम्पियन असलेल्या बलाढ्य जर्मनीवर विजय मिळवला. सौदी अरेबियाच्या आश्चर्यकारक पुनरागमनाच्या विजयाप्रमाणेच, जपाननेही जर्मनविरुद्ध 2-1 असा विजय नोंदवला.

पहिल्या सत्रात जर्मनीचे वर्चस्व

जर्मनीच्या इल्के गुएन्डोगनने ३३व्या मिनिटाला पेनल्टीद्वारे गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली जी हाफटाइम ब्रेकपर्यंत कायम राहिली. पण दुसऱ्या हाफमध्ये ते आघाडी वाढवण्यात अपयशी ठरले. दुसऱ्या सत्रातही जर्मनीने काही काळ आपल्याकडे वर्चस्व राखले होते. पण दुसरे सत्र अर्धे झाले आणि त्यानंतर सामन्याचे संपूर्ण चित्रच बदलल्याचे पाहायला मिळाले (Japan stuns Germany).

हे ही वाचा: सौदी अरेबियाने दिला बलाढ्य अर्जेन्टिनाला मोठा धक्का

Japan stuns Germany: जपानची चमकदार कामगिरी

जपानने शेवटच्या 15 मिनिटांच्या खेळात चमकदार कामगिरी केली. सामन्याच्या ७५ व्या मिनिटाला जपानच्या डोअनने पहिला गोल केला आणि त्यांना जर्मनीबरोबर १-१ अशी बरोबरी साधता आली. जपानसाठी ही मोठी गोष्ट होती. कारण हा सामना जपान पराभूत होईल, असे भाकीत यापूर्वी बऱ्याच जणांनी वर्तवले होते. पण त्यांच्या या गोलमुळे संघात चैतन्य निर्माण झाले.

पहिला गोल झाल्यावर जपानचा संघ चांगलाच चार्ज झाला आणि याचा परीणाम त्यानंतरही पाहायला मिळाला. जपानचे चाहतेही स्टेडिअमवर जल्लोष करून संघाला साथ देऊ लागले. त्यानंतर सामन्याच्या ८३व्या मिनिटाला ताकुमा असानोने गोल केला आणि जपानच्या संघाने २-१ अशी आघाडी घेतली. जपानने आघाडी घेतल्यावर स्टेडियममधील वातावरण बदलले. त्यांचे दोन पर्यायी खेळाडू रित्सू डोआन आणि ताकुमा असानो यांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर जपानने जर्मनीला नामवित इतिहास घडवला (Japan stuns Germany). आपला पहिलाचा सामना जर्मनी सहजपणे जिंकेल, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण आजच्या सामन्यात सर्वांनाच मोठा धक्का बसला.

बचावावर जोर

जपानच्या संघाने दुसरा गोल केल्यानंतर बचावावर जोर दिला आणि जर्मनीला एकही गोल करू दिला नाही. शेवटची २० मिनिटे वगळता, पूर्ण सामन्यावर जर्मनीचेच वर्चस्व होते पण ते मिळालेल्या संधी गमावत राहिले आणि प्रत्येक गमावलेल्या संधीसह जपानसाठी पुनरागमनाचे दरवाजे उघडे राहिले होते. जपानच्या आक्रमणात फारशी धार नव्हतीच पण ७५ व्या मिनिटाला त्यांनी केलेल्या गोल नंतर त्यांचा खेळ पूर्ण बदलला.

2018 च्या दुःस्वप्नची पुनरावृत्ती

2018 च्या विश्वचषकातही पहिल्या सामन्यात जर्मनीला मेक्सिको कडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर ते सावरू शकले नव्हते. दक्षिण कोरियाकडून झालेल्या दुसर्‍या पराभवानंतर गट फेरीतूनच त्यांना घरी परत जावे लागले होते. आजच्या पराभवामुळे मागच्या वर्ल्ड कप च्या दुःस्वप्नची पुनरावृत्ती होते की काय अशी चिंता आता जर्मनीच्या चाहत्यांना वाटत आहे.

जर्मनीला आता स्पेनविरुद्ध होणाऱ्या आगामी सामन्यात विजय आवश्यक आहे. जपानचा पुढील सामना कोस्टा रिकासोबत आहे आणि आजच्या विजयानंतर ते अंतिम 16 मध्ये जाण्याचे स्वप्न पाहू लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *