Facebook Blue Tick Service: ट्विटरपाठोपाठ आता फेसबुक आणि इंस्टाग्रामही ब्लू टिक व्हेरिफिकेशनसाठी (Facebook Blue Tick Service) शुल्क आकारणार आहे. मेटाचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुक पोस्टवरून सबस्क्रिप्शन सर्व्हिसबद्दल माहिती दिली. म्हणजेच आता फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हेरिफाईड अकाऊंट म्हणजेच ब्लू टिकसाठी पैसे द्यावे लागतील. वेबसाठी त्याची किंमत $11.99 (रु. 993) आणि iOS साठी $14.99 (रु. 1241) सेट केली आहे.
Facebook Blue Tick Service: झुकरबर्ग यांची पोस्ट
झुकरबर्ग यांनी लिहले की, या आठवड्यात आम्ही मेटा व्हेरिफाईड सेवा सुरू करत आहोत. ही सबस्क्रिप्शन सेवा आहे. यामध्ये तुम्हाला सरकारी ओळखपत्राद्वारे ब्लू टिक मिळेल आणि अकाऊंटचे व्हेरिफेशन करता येईल. विशेष बाब म्हणजे या निर्णयाने तुमच्या खात्याला अतिरिक्त प्रोटेक्शन मिळू शकेल. ही नवीन सेवा सत्यता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी आहे.
हे ही वाचा: पाकिस्तान दिवाळखोरीच्या वाटेवर
Facebook Blue Tick Service: ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडपासून सुरूवात
झुकेरबर्ग यांनी सांगितले की, आम्ही या आठवड्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये ही सेवा सुरू करणार आहोत. त्यानंतर ती अन्य देशांमध्ये सुरू होईल. यासाठी, यूजर्सला वेबसाठी दरमहा 11.99 डॉलर म्हणजेच सुमारे 1 हजार रुपये आणि iOS यूजर्ससाठी 14.99 डॉलर म्हणजेच 1,200 रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. ही सेवा भारतात कधी लागू होणार याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
Facebook Blue Tick Service: काय होईल फायदा?
सब्सस्क्रिप्शन घेणारे यूजर्स एका सरकारी ओळखपत्राद्वारे त्याची प्रोफाईल व्हेरिफाय करू शकतील. प्रोफाईल पडताळणीसोबतच, Facebook आणि Instagram चे सदस्यत्व देखील वापरकर्त्यांना फसवणुकीपासून अतिरिक्त संरक्षण प्रदान करेल.
भारतात ट्विटरचे ब्लू सबस्क्रिप्शन-650 रुपये, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन – 900 रुपये
एलन मस्क यांना ट्विटरला 2023 च्या अखेरपर्यंत आर्थिकदृष्ट्या मजबूत करायचे आहे. महसूल वाढवण्यासाठी त्यांनी ब्लू सबस्क्रिप्शनसारख्या काही सेवांमध्येही बदल केले आहेत. भारतातील वेब वापरकर्त्यांसाठी या सेवेची मासिक सदस्यता 650 रुपये आहे. दुसरीकडे, 18 फेब्रुवारी रोजी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) पद्धतीबाबत नवीन घोषणा करण्यात आली. कंपनीने ट्विट करून सांगितले की, 20 मार्चपासून फक्त ट्विटर ब्लूचे सदस्य त्यांच्या टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) पद्धती म्हणून मजकूर संदेश वापरू शकतील.