fbpx

Excitement for Riteish Deshmukh’s ‘Ved’: रितेश देशमुखचा ‘वेड’

Riteish Deshmukh: दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अभिनेता रितेश देशमुखने चाहत्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. त्याची ही घोषणा म्हणजे चाहत्यांसाठी जणू दिवाळी गिफ्टच आहे. रितेशने पोस्ट शेअर करीत त्याचा बहुचर्चित सिनेमा ‘वेड‘ कधी प्रदर्शित होणार (Riteish Deshmukh Upcoming Marathi Movie) हे जाहीर केले आहे. पोस्टरद्वारे त्याने चाहत्यांना एक सरप्राइजही दिलं आहे. हे सरप्राइज म्हणजे जिनिलियाही या सिनेमात असणार आहे. या सिनेमाद्वारे ती मराठी सिनेमात डेब्यू (Genelia Deshmukh First Marathi Movie) करणार आहे. या सिनेमाची आणखी एक खासियत म्हणजे ‘वेड’ सिनेमातून रितेश देशमुख दिग्दर्शनात पदार्पण करत आहे.

Riteish Deshmukh ची पोस्ट

२६ ऑक्टोबर रोजी रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) शेअर केलेल्या पोस्टमध्ये ‘वेड’ या त्याच्या सिनेमाची प्रदर्शनाची तारीख आणि सिनेमाचं नवंकोरं पोस्टर दिसत आहे. या पोस्टमध्ये जिनिलिया आणि रितेश दोघेही दिसत आहेत. जिनियाचे डोळ्याच्या कडा काहीशा ओलावल्या असून रितेश धुम्रपान करताना दिसतो आहे. त्यामुळे हे ‘वेड’ नक्की कसले आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. दरम्यान ‘वेड’ हा सिनेमा ३० डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे रितेशने जाहीर केले. सिनेमाचं पोस्टर पाहून ‘कबीर सिंग’ ची आठवण झाल्याशिवाय राहात नाही त्यामुळे हा सिनेमा कसा असेल याबद्दल चाहत्यांमध्ये कुतूहल आहे.

हे ही वाचा: प्रशांत दामले यांची पुन्हा विक्रमाकडे वाटचाल

वेडेपणा करायला मुहूर्त नसतो

रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) ही पोस्ट शेअर करताना म्हटले आहे की, ‘वेडेपणा करायला मुहूर्त नसतो पण केलेला वेडेपणा एखाद्या मुहूर्तावर जाहीर करायला काय हरकत आहे! आज दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छांसकट सादर करतोय तारिख आणि चित्रपटाचा फर्स्ट लूक. आमचं #वेड तुमच्यापर्यंत येतंय ३० डिसेंबरला तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असू द्या.’

रितेश आणि जिनिलियाने या सिनेमाचे एकूण तीन पोस्टर शेअर केले आहेत. या तिन्ही पोस्टरमधून ‘वेड’ची कहाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पोस्टरवरुन ही कथा प्रेम आणि विरहाची असावी असा अंदाज लावला जात आहे. दरम्यान नेमकं कथानक काय असेल हे ३० डिसेंबर रोजीच समजेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *