fbpx

Fearless England Won the T20 World Cup 2022: इंग्लंड संघानं दुसऱ्यांदा जिंकला टी20 विश्वचषक

England Won the T20 World Cup 2022: टी20 विश्वचषक स्पर्धेतील (T20 World Cup 2022) अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानवर 5 विकेट्सनी विजय मिळवत इतिहास रचला आहे. पाकिस्तानला मात देत इंग्लंडनं दुसऱ्यांदा टी20 विश्वचषकावर नाव कोरलं आहे (England Won the T20 World Cup 2022). ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला गेलेला हा सामना लो स्कोरिंग असूनही अत्यंत चुरशीचा झाला. दोन्ही संघांनी आपली बलस्थाने वापरत सामना आपल्या दिशेने झुकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला त्यामुळे हा सामना रंगतदार झाला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ८ गाड्यांच्या मोबदल्यात फक्त १३७ धावा केल्या. असं असलं तरीही दुसऱ्या इनिंगच्या सोळाव्या षटकापर्यंत पाकिस्तानचे पारडे जड होते.

नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने

गोलंदाजांसाठी उपयुक्त वाटणाऱ्या पीचवर महत्वाचा ठरणारा नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला. कर्णधार जोस बटलरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि इंग्लंडच्या गोलंदाजांनीही उत्तम गोलंदाजी करीत त्याचा निर्णय योग्य असल्याचं दाखवले. २० षटकांमध्ये पाकिस्तानला अवघ्या 137 धावा करता आल्या.

पाकिस्तानची पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आणि रिझवान यांनी चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. पण 15 धावा करुन रिझवान बाद झाला. मग मोहम्मद हॅरीसही 8 धावांवर बाद झाला. कर्णधार बाबर चांगली फलंदाजी करत होता, पण 32 धावा करुन तोही तंबूत परतला. इतरही फलंदाज स्वस्तात माघारी परतत होते. पण शान मसूदने फटकेबाजी करत 28 चेंडूत 38 धावा ठोकत पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा केल्या. इतर फलंदाज खास कामगिरी करु न शकल्याने 137 धावांवर पाकिस्तानचा डाव आटोपला.

इंग्लंडकडून सर्वच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. पण अष्टपैलू सॅम करनने 4 ओव्हरमध्ये केवळ 12 धावा देत 3 महत्त्वाचे विकेट्स घेतले. त्याने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली. ख्रिस जॉर्डन आणि आदिल राशीद यांनीही प्रत्येकी 2 विकेट्स घेतले. बेन स्टोक्सनं एक महत्त्वाची विकेट घेतली.

हे ही वाचा: टी-20 विश्वचषकातील अनपेक्षित निकाल

पाकिस्तानची भेदक गोलंदाजी

कागदावर सोप्या वाटणाऱ्या या आव्हानाला पाकिस्तानच्या गोलंदाजांनी अवघड बनविले. त्यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे इंग्लंडच्या संघाची पहिली फळी पहिल्या पॉवरप्ले मध्येच गारद झाली आणि 138 धावाचं आव्हान इंग्लंडसाठी अवघड झालं. पहिल्यात षटकात शाहीन आफ्रिदीने इंग्लंडला पहिला धक्का दिला. अॅलेक्स हेल्स फक्त 1 धाव करुन बाद झाला. त्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी फिल सॉल्ट आणि कर्णधार जोस बटलर यांनाही बाद केले. त्यामुळे इंग्लंडची अवस्था ३ बाद ४५ अशी झाली. फिलीपने 10 तर कर्णधार बटलरने 26 धावा केल्या. पण त्यानंतर बेन स्टोक्स आणि हॅरी ब्रुक यांनी संघाचा डाव सावरला. पुढे हॅरी ब्रुकही बाद झाला. नंतर आलेल्या मोईन अलीने स्टोक्सला साथ दिली पण १९ धावा काढून तोही बाद झाला.

या संकटकाळी इंग्लंडच्या अष्टपैलू स्टार खेळाडू बेन स्टोक्सने एकहाती झुंज दिली आणि नाबाद 52 धावा करत 5 गडी राखून इंग्लंडला विजय मिळवून दिला. या विजयासह 2010 नंतर पुन्हा एकदा इंग्लंडनं टी20 विश्वचषक जिंकला आहे. अप्रतिम गोलंदाजी करणाऱ्या सॅम करनला सामनावीर तसंच मालिकावीर म्हणून यावेळी गौरवण्यात आलं.

England Won the T20 World Cup 2022: सामन्यातला टर्निंग पॉईंट

पाकिस्तानची (Pakistan) 16 वी ओव्हर या सामन्यातली टर्निंग पॉईंट ठरली होती. या 16 व्या ओव्हर पुर्वी पाकिस्तान हा सामना जिंकेल असे प्रत्येक चाहत्यांना वाटत होते. त्याप्रमाणे पाकिस्तान भेदक गोलंदाजी देखील करत होती. आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी धडकी भरत होती. मात्र 16 व्या ओव्हरमध्ये एक अशी घटना घडली. या घटनेनंतर पाकिस्तान पराभवाच्या छायेत गेली होती.

‘हा’ खेळाडू झाला जखमी

16 वे षटक सुरु होण्यापुर्वी इंग्लंडने 4 गडी गमावून 97 धावा केल्या होत्या. इंग्लंडचा संघ तेव्हा खूप दबावात होती. हा दबाव आणखी वाढवण्यासाठी पाकिस्तानचा शाहिन आफ्रिदी (Shaheen Afridi) १६वे षटक टाकण्यासाठी आला. त्याने ओव्हरचा पहिला बॉल टाकताच तो जखमी झाला. या दुखापतीमुळे त्याला धाव घेण्यास त्रास होत होता आणि त्याने अचानक मैदान सोडले. पाकिस्तानसाठी ही ओव्हर खूप महत्वाची होती. आणि या महत्वाच्या ओव्हरमध्येच तो दुखापतग्रस्त झाला होता. आणि इथूनच पाकिस्तानच्या पराभवाला सुरूवात झाली होती (England Won the T20 World Cup 2022).

…तर पाकिस्तान जिंकली असती

शाहीन आफ्रिदीने (Shaheen Afridi) केवळ २ षटके टाकली ज्यात त्याने १३ धाव देऊन १ विकेट काढली होती. तर तिसऱ्या षटकाचा त्याला फक्त १ चेंडू टाकता आला आणि त्यानंतर तो दुखापतग्रस्त झाला. इतर ५ चेंडू दुसऱ्या खेळाडूला टाकावे लागले. दरम्यान असं पाहायला गेलं तर तो १ चेंडू सोडला तर आफ्रिदीकडे (Shaheen Afridi) डेथ ओव्हरमधली २ षटके होती आणि जर ही दोन षटके जर त्याला टाकता आली असती तर या ओव्हर्समधून पाकिस्तानला इंग्लंडवर चांगलाच दबाव टाकता आला असता. आणि त्यामुळे कदाचित या वर्ल्ड कप जेतेपदाचा निकाल वेगळा लागला असता (England Won the T20 World Cup 2022). मात्र आफ्रिदीच्या दुखापतीमुळे ते शक्य झाल नाही.

पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या अस्त्राने मैदान सोडताच इंग्लंडने सामन्यात पुनरागमन केले आणि 5 विकेट राखून पाकिस्तानला नमवून टी २० वर्ल्ड कप २०२२ वर (T20 World Cup) आपलं नाव कोरलं (England Won the T20 World Cup 2022).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *