fbpx

Dadasaheb Phalke Award 2023: ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ सोहळा मुंबईत संपन्न

Dadasaheb Phalke Award 2023: दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. इ. स. १९६९ मध्ये दादासाहेब फाळके ह्यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे. या वर्षीचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ सोहळा (Dadasaheb Phalke Award 2023) सोमवार, २० फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबईत पार पडला. यावेळी हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणी वर्तुळातील अनेक मान्यवर उपस्थित होते.   चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि लोकप्रिय कलाकारांना या वेळी पुरस्कृत करण्यात आले. अभिनेत्री आलिया भट्टला ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. ‘ब्रह्मास्त्र’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून रणबीर कपूरची निवड करण्यात आली. ‘कांतारा’ फेम अभिनेता ऋषभ शेट्टीची सर्वोत्कृष्ट प्रॉमिसिंग अ‍ॅक्टर म्हणून निवड करण्यात आली. आलिया भट्ट या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होती पण रणबीर कपूर आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईबाहेर असल्याने या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहू शकला नाही. त्यामुळे आलियाने रणबीरच्या वतीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार स्वीकारला.

‘आरआरआर’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटांचा सन्मान

एस.एस. राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ आणि विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटांचा दादासाहेब आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार (Dadasaheb Phalke Award) देऊन गौरव करण्यात आला. ‘RRR’ या चित्रपटाला फिल्म ऑफ द इयर आणि ‘द काश्मीर फाइल्स’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. विवेक अग्निहोत्री यांनी हा पुरस्कार सर्व दहशतवाद पीडितांना आणि देशातील लोकांना समर्पित केला. 

वरुण धवनला ‘भेडिया’साठी क्रिटिक्स बेस्ट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. तर अभिनेते अनुपम खेर यांना ‘द काश्मीर फाइल्स’साठी मोस्ट व्हर्सटाइल अ‍ॅक्टर म्हणून गौरविण्यात आले. रेखा यांचा चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.

हे ही वाचा: मैने प्यार किया’साठी भाग्यश्री नव्हती पहिली पसंत

Dadasaheb Phalke Award: रेखा आणि आलियाने वेधले लक्ष

दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यातील फोटोज आणि व्हिडिओज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सोहळ्यात रेखा, आलिया भट्ट, वरुण धवन, अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री, ऋषभ शेट्टी, रोनित रॉय, श्रेयस तळपदे, आर. बाल्कीसह अनेक सेलिब्रिंटींनी हजेरी लावली होती. मात्र सर्वाधिक लक्ष वेधले ते रेखा आणि आलियाने. पुरस्कार सोहळ्यात आलियाने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. तर रेखा यांनी सोनेरी रंगाची कांजीवरम साडी परिधान केली होती. दोघींनी या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर अवॉर्ड्ससोबत भरपूर फोटो पोजही दिल्या. 

Dadasaheb Phalke Award 2023: दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांची यादी

पुरस्कारविजेते
बेस्ट फिल्मद काश्मीर फाइल्स
फिल्म ऑफ द ईयरRRR
बेस्ट अ‍ॅक्टररणबीर कपूर (ब्रह्मास्त्र)
बेस्ट अ‍ॅक्ट्रेसआलिया भट्ट (गंगूबाई काठियावाड़ी)
क्रिटिक्स बेस्ट अ‍ॅक्टरवरुण धवन (भेड़िया)
क्रिटिक्स बेस्ट अ‍ॅक्ट्रेसविद्या बालन (जलसा)
बेस्ट डायरेक्टरआर बाल्की (चुप)
बेस्ट सिनेमॅटोग्राफरपीएस विनोद (विक्रम वेधा)
मोस्ट प्रॉमिसिंग अ‍ॅक्टरऋषभ शेट्टी (कांतारा)
बेस्ट अ‍ॅक्टर सपोर्टिंग रोलमनीष पॉल (जुग-जुग जियो)
बेस्ट प्लेबॅक सिंगर मेलसांचेत टंडन (जर्सी- माइया मैनूं)
बेस्ट प्लेबॅक सिंगर फीमेलनीति मोहन (गंगूबाई काठियावाड़ी- मेरी जान)
बेस्ट वेब सिरीजरुद्र (हिंदी)
मोस्ट व्हर्सेटाइल अ‍ॅक्टरअनुपम खेर (द कश्मीर फाइल्स)
टेलीविजन सिरीज ऑफ द ईयरअनुपमा
बेस्ट अ‍ॅक्टर इन टेलिव्हिजन सिरीजजेन इमाम (फना)
बेस्ट अ‍ॅक्ट्रेस इन टेलिव्हिजन सिरीजतेजस्वी प्रकाश (नागिन)
आउट स्टँडिंग काँट्रिब्यूशन इन फिल्म इंडस्ट्रीरेखा
आउट स्टँडिंग काँट्रिब्यूशन इन म्युझिक इंडस्ट्रीहरिहरन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *