भारतात अशी अनेक धार्मिक स्थळे आहेत, त्यांच्या संबंधित रंजक गोष्टी इतरांपेक्षा खूप वेगळ्या आहेत. भारतातल्याच एखाद्या मंदिरात जर प्रसाद म्हणून नूडल्स मिळाले तर कसं वाटेल तुम्हाला? आश्चर्य वाटेल ना? पण हे खरं आहे. भारतात एक मंदिर आहे ज्याला चायनीज काली मंदिर (Chinese Kali Mata Mandir) म्हणतात. विशेष म्हणजे येथे नूडल्सचा प्रसाद दिला जातो. हे थोडे विचित्र जरी वाटत असलं तरी मात्र हे खरं आहे.
हे ही वाचा : अन्नपूर्णा स्तोत्रम्
Chinese Kali Mata Mandir: चायनीज काली मंदिर
पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील ‘चायनीज काली टेंपल’ (Chinese Kali Mata Mandir) या नावाने प्रसिद्ध असलेल्या मंदिरात नूडल्स, मोमोजपासून ते भात आणि भाजीपाला पदार्थांपर्यंत प्रसाद मिळतो. हे मंदिर कोलकात्याच्या माथेश्वरताला रोडवर वसलेले आहे, टांगरा याला ‘चायना टाउन’ देखील म्हणतात.
साधारण ६० वर्षांपूर्वी टेंगरा या भागात कालीमातेचे कोणतेच मंदिर नव्हते. केवळ एका झाडाखाली काही काळ्या दगडांची देवी म्हणून स्थानिक लोकांकडून पुजा-अर्चना केली जात असे. त्या भागात इतर लोकांबरोबरच काही चायनीज लोकही रहात होते. त्यांच्यापैकी एक लहान मूल आजारी पडले. अनेक प्रकारचे उपचार करूनही ते मूल काही बारे होईना. त्यावेळी कोणीतरी त्या मुलाच्या पालकांना त्या झाडाखालील देवीची उपासना करायला सांगितली. हा ही उपाय करून बघू या विचाराने त्या चायनीज आई वडिलांनी त्या झाडाखालच्या देवीची उपासना केली आणि त्यांच्या मुलाच्या तब्येतीत फरक पडू लागला. काही दिवसांनी ते बाळ पूर्ण बरे झाले. त्यानंतर त्या भागातील चायनीज लोकांनी देवी कालीची भक्ती करायला सुरवात केली. काही वर्षानी त्यांनी त्या काळ्या दगडांभोवती मंदिर बांधले.
या मंदिरात भाविकांना प्रसादाच्या रूपात नूडल्स दिले जातात आणि यामुळे ते इतर मंदिरांपेक्षा वेगळे आहे. सध्याचे ग्रनाईट दगडात बांधलेले मंदिर हे १९ वर्षे जुने आहे. त्याचबरोबर त्या मंदिरात देवी कालीच्या दोन पारंपारिक मुर्तींची देखील स्थापना करण्यात आली आहे. त्या भागातील भक्तांबरोबर देवीचे चायनीज व बौद्ध भक्त देखील कालीच्या दर्शनाला तेथे मोठ्या संख्येने येतात. म्हणून या मंदिराचे नाव ही चायनीज काली मंदिर (Chinese Kali Mata Mandir) असे पडले आहे.
टेंगरा येथे बौद्ध आणि ख्रिश्चन प्रथा अधिक पाळल्या जात असल्या तरी नवरात्रीच्या काळात येथील कालीपूजेचे वेगळेच सौंदर्य पाहायला मिळते. हे मंदिर १९९८ मध्ये बांधण्यात आल्याचे सांगितले जाते.