भारताचा स्टार कसोटीपटू चेतेश्वर पुजारा गेल्या काही महिन्यांपासून इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट शानदार कामगिरी करत आहे. आता त्याने रॉयल लंडन स्पर्धेत स्फोटक फलंदाजी करत धुव्वाधार अर्धशतकीय खेळी केली आहे.
पुजाराची कामगिरी
पुजारा गेल्या काही महिन्यांपासून इंग्लंडमध्ये ससेक्स संघाकडून काउंटी क्रिकेट खेळत आहे. या दरम्यान त्याने शतक आणि द्विशतकाचा धडाकाच लावला. आता पुजाराने टी-२० स्टाइलने फलंदाजी सुरू केली आहे. ज्या पुजाराला पहिली धाव घेण्यासाठी ४० -५० चेंडू खेळल्याचे पाहिले त्यांना आता पुजाराची स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली आहे.
सध्याच्या काऊंटी हंगामात ससेक्ससाठी जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या चेतेश्वर पुजाराने शुक्रवारी (१२ ऑगस्ट) वॉरविकशायरविरुद्ध ७९ चेंडूत १०७ धावांची खेळी करताना त्याच्या फलंदाजीची वेगळी बाजू दाखवली. पुजारा 22 व्या षटकात 112/2 वर फलंदाजीसाठी आला आणि 48.1 षटकात 291/7 अशी धावसंख्या घेऊन बाहेर पडला. त्याचा डाव 7 चौकार आणि 2 षटकारांनी रचला होता, ज्यात वेगवान गोलंदाज लियाम नॉर्वेलच्या 22 धावा होत्या.
कसोटी संघात दावेदारी
पुजाराच्या या कामगिरी मुळे भारतीय कसोटी संघात त्याची दावेदारी पुन्हा मजबूत झाली आहे. भारतीय संघ येत्या फेब्रुवारीत घरच्या मैदानांवर ऑस्ट्रेलियाशी दोन हात कारणार आहे. जरी त्याला बराच अवकाश असला तरीही पुजाराचा चांगला फॉर्म आणि आक्रमकता ही भारतीय संघासाठी निश्चित आनंदाची बाब आहे.
भारतीय संघ संध्या आशिया चषक, टी ट्वेन्टी विश्वचषक आणि इतर पांढऱ्या चेंडूच्या मालिका खेळण्यात व्यस्त आहे.