fbpx

Chandrayaan 3 : चांद्रयान 3 यानाने पाठवला चंद्राचा पहिला फोटो, ISRO च्या टीममध्ये उत्साह

:

Chandrayaan 3 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO ने चांद्रयान 3 मोहिमेअंतर्गत चंद्राचा पहिला फोटो प्रसिद्ध केला आहे. भारताच्या या तिसऱ्या चंद्र मोहिमेला आलेलं हे पहिलं यश आहे. चांद्रयान 3 ने (Chandrayaan 3) शनिवारी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर ही छायाचित्रं घेतली आहेत.

Chandrayaan 3 : चंद्राची पहिली झलक

5 ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी चांद्रयान 3 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. लूनर ऑर्बिट इंजेक्शनच्या माध्यमातून चांद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत आणण्याची प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत प्रवेश करताना चंद्राची छायाचित्रे टिपली आहेत. याचा 45 सेकंदचा व्हिडिओ ISRO ने ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. 14 जुलै रोजी चांद्रयान 3 हे दिशेने झेपावले आहे.

Chandrayaan 3 : चांद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश

भारताच्या चांद्रयान 3 (Chandrayaan 3) ने अखेर चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. बंगळुरु येथून इस्रोने दिलेल्या कमांडप्रमाणे चांद्रयान 3 (Chandrayaan 3) ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे आणि चंद्राचे फोटो घेतले आहेत, जे ट्विटर पेजवरुन प्रसारित करण्यात आले आहेत. शनिवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास चांद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्याची प्रक्रिया सुरु झाली आणि ती यशस्वी झाल्याचं इस्रोने म्हटलं आहे. त्यामुळे आता चांद्रयान 3 (Chandrayaan 3) चा चंद्राच्या भूमीवर लॅंड होण्याचा प्रवास सुरु झाला आहे.

वंदे महाराष्ट्र ला मिळालेल्या माहितीनुसार, चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यावर तिथेल प्रत्यक्षात दृष्य कसे असेल हे पाहण्याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागली आहे. चांद्रयान 3 हे नियोजीत प्रोग्रामनुसार विना व्यत्यय काम करत आहे. सर्व गोष्टी या अपेक्षेप्रमाणे घडत आहेत. यामुळे चांद्रयान- 3 मोहिमेत सहभागी असलेल्या ISRO च्या टीममध्ये वेगळाच उत्साह पहायला मिळत आहे. चांद्रयान चंद्राच्या कक्षेत गेल्याने मैलाचा दगड पार पडला आहे, त्यामुळे इस्रोच्या कामगिरीत आणखी मानाचा तुरा रोवला गेला आहे.

हे ही वाचा: चंद्र आहे साक्षीला… चंद्रयान ३ चे यशस्वी प्रक्षेपण

23 ऑगस्टला सॉफ्ट लँडिंग

आता 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान सॉफ्ट लॅंडिंगचा प्रयत्न करणार आहे. हा प्रयत्न जर यशस्वी झाला तर अमेरिका, रशिया, चीननंतर भारत हा चंद्रावर पोहोचणारा चौथा देश ठरणार आहे. चंद्रयान 3 (Chandrayaan 3) 14 जुलै रोजी आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथून अवकाशात झेपावलं आहे.

सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास आता चांद्रयानाचे आणखी दोन टप्पे असतील. येत्या 17 ऑगस्ट रोजी विक्रम लँडर वेगळे होईल आणि 23 ऑगस्टला यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. जेव्हा चांद्रयान-3 लँडर चंद्रावर उतरेल, तेव्हा असं करणारा भारत हा जगातील चौथा देश असेल. यापूर्वी हा पराक्रम केवळ अमेरिका, रशिया आणि चीनलाच करता आला आहे. चांद्रयान 3 चे रोव्हर ज्या भागात उतरणार आहे, त्या भागावर आतापर्यंत कोणत्याही देशाचा रोव्हर नसल्याने या कामगिरीकडे देशासह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलं आहे.

चांद्रयान मोहिमेचा उद्देश काय आहे?

चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला असला, तरी चंद्रावर उतरणं ही सुद्धा अत्यंत आव्हानात्मक प्रक्रिया असते. रोव्हर जेव्हा उतरेल तेव्हा सूर्यप्रकाश आवश्यक असतो. चंद्रावर सूर्य फक्त 14-15 दिवस बाहेर येतो. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी याची तंतोतं काळजी घेतली असली तरी हे आव्हान कायम असेल. लँडरसोबत एक रोव्हर (छोटा रोबो) देखील आहे, जो चंद्राच्या पृष्ठभागाचा शोध घेईल आणि आवश्यक डेटा पृथ्वीवर पाठवेल. चांद्रयान 3 चा रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर कोणती खनिजं आहेत, हवा आणि पाण्याच्या काय शक्यता आहेत याचा शोध घेणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *