शेअर मार्केटच्या मदतीने सामान्य मनुष्य सुद्धा मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये हिस्सेदारी मिळवू शकतो. परंतु शेअर मार्केट (share market) ही एक अशी जागा जिथे बरेच लोग पैसे कमवतात तर बरेच लोक आपले पैसे गमावून पण टाकतात. बाजाराविषयी असलेले अपुरे ज्ञान, भीती किंवा घाई मुळे न विचार करता पत्करलेली जोखीम अश्या अनेक गोष्टी या साठी कारणीभूत आहेत.
सीए निखिलेश सोमण यांचे सत्र
आपण स्टॉक मध्ये SIP करू शकतो आणि फक्त लॉन्ग टर्मच नाही अगदी शॉर्ट टर्म मध्येही पण चांगला परतावा मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो. ह्याचे अनेक फायदे देखील आहेत. हे सर्व अगदी सोपे आहे, ते कसे ते येत्या शनिवारी, 8 ऑक्टोबर २०२२ रोजी जाणून घ्या सी ए निखिलेश सोमण (CA Nikhilesh Soman) यांच्या कडून.
ह्या संबंधी एक संवाद शनिवारी संध्याकाळी संध्याकाळी ६.०० ते ७.३० मध्ये आयोजित केला आहे. जर आपणास ह्या विषयी अधिक जाणून घ्यावयाचे असेल तर ऑनलाईन सत्र नक्की जॉईन करा.
नाव नोंदणी आवश्यक
गुंतवणुकीबाबत जागरूकता निर्माण व्हावी या दृष्टीने या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे त्यामुळे हे सत्र सर्वाना विनामूल्य अटेंड करता येईल फक्त त्या करता नाव नोंदणी मात्र शुक्रवार रात्री पर्यंत करावी लागेल. नोंदणी साठी, I am Interested आणि आपले पूर्ण नाव असा मेसेज सीए निखिलेश सोमण यांना 9594083769 ह्या व्हाट्स अँप वर पाठवावा. लक्षात ठेवा तुम्हीच तुमच्या गुंतवणुकीचा शिल्पकार आहात.
निखिलेश सोमण हे चार्टड अकाऊंटट असून गेले १६-१७ वर्ष शेअर बाजारात अभ्यासक म्हणून कार्यरत आहेत , आजवर अनेक संस्थातून, सीए इन्स्टिट्यूट मधील विविध शाखा ह्यामध्ये शेअर बाजाराशी निगडित विविध विषयांवर सुमारे २५० पेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत. विविध मराठी चॅनल वर देखील अनेक वेळा शेअर बाजार तज्ञ म्हणून त्यांचे मार्गदर्शन घेतले जाते प्रामुख्याने TV9, लोकशाही अशा चॅनल वर बजेट दिनी ते विश्लेषण करतात. कोरोना काळात त्यांनी अनेकांना शेअर बाजार म्हणजे काय, गुंतवणूक, ट्रेडिंग कसे करावे हे त्यांच्या डेअर टू शेअर ह्या कार्यशाळेतून शिकवले ह्यावेळी मात्र म्यूचल फंडाच्या फंदात न पडता स्वतः कसे उत्तमरित्या आपण आपला portfolio बनवू शकता, सांभाळू शकता. सीए निखिलेश सोमण ह्यावर त्यांचे विचार ते मांडणार आहेत, ‘तूच आहेस तुझ्या गुंतवणुकीचा शिल्पकार’ हे त्यांच्या कार्यशाळेचे ब्रीदवाक्य आहे.
सीए निखिलेश सोमण
9594083769 (W/A)