Borivali – Thane Tunnel Road Project : बहुप्रतिक्षित बोरिवली – ठाणे टनल रोड प्रोजेक्टचं काम लवकरच सुरू होणार आहे. राज्यातील सर्वात लांब बोरिवली – ठाणे टनल रोडसाठीचं काम दोन कंपन्यांना मिळू शकतं. या प्रकल्पासाठी लार्सन अँड टुब्रो अर्थात एलएनटी आणि मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या दोघांना या प्रकल्पाचं काम मिळू शकतं. हा प्रकल्प २०१५ मध्ये प्रस्ताविक करण्यात आला होता. मात्र आता त्याचं काम लवकरच सुरू होईल अशी माहिती आहे. ठाणे – बोरिवली टनल ११.८४ किमी इतका लांब असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यात प्रकल्पात दोन पॅकेज असतील. त्यापैकी एक बोरिवलीकडे जाणारा ५.७५ किमी लांब जुळ्या ट्यूब रोड टनलचं डिझाइन लार्सन अँड टुब्रो कंपनीला दिलं जाईल. तर पॅकेज दोनमध्ये ठाण्याकडे जाणाऱ्या ६.९ किमी लांब जुळ्या ट्यूब रोड टनलचं डिझाइन आणि निर्मिती करण्याचं काम मेघा इंजिनिअरिंगकडे दिली जाईल. त्याशिवाय या दोन्ही टनलवरुन संयुक्तपणे एक किमीचे रस्ते तयार होतील.
हे ही वाचा: फेक कॉल्सला आळा घालण्यासाठी आता ट्रायने कसली कंबर
Borivali – Thane Tunnel Road Project : दोन तासांचे अंतर पार होणार १५ मिनिटात
ठाणे – बोरिवरी या डायरेक्ट लिंकची एकूण लांबी ११.८ किमी असणार आहे. या मार्गावर ३ + ३ अशा लेन असतील. अंडर ग्राउंड टनलची लांबी १०.८ किमी असणार आहे. ठाणे – बोरिवली अशा मार्गावर घोडबंदरवरुन जाताना सध्या जवळपास दोन तासांचा कालावधी लागतो. मात्र या ठाणे – बोरिवली डायरेक्ट लिंकमुळे हा कालावधी दोन तासांवरुन थेट १५ मिनिटांवर येणार आहे. ठाणे – बोरिवली या भुयारी रोडसाठी जवळपास ८९०० कोटींचा खर्च येणार आहे.
घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी होणार कमी
सध्या बोरिवली – ठाणे प्रवासासाठी घोडबंदरवरुन जाण्याचा मार्ग आहे. हा रोड मीरा रोड ते ठाण्याचा पूर्व द्रुतगती महामार्ग असा आहे. हा मार्ग अतिशय लांब असून या मार्गावरुन जाताना टोलही लागतो. घोडबंदर रोडवर मोठी वाहतूक कोंडी असते. मात्र ठाणे – बोरिवली हा टनल रोड सुरू झाल्यास घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होईल.
पश्चिम उपनगर बोरिवलीतील मागाठाणे येथील एकता नगर आणि ठाण्यातील मानपाडा येथील टिकुजी नी वाडी येथील मार्गावरुन हा टनल रोड जोडला जाईल. या टनल रोडमुळे ठाणे – बोरिवली प्रवासाचा वेळ वाचणार असून वाहतूककोडींही कमी होण्यास मदत होणार आहे.