fbpx

Biggest Upsets of T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकातील अनपेक्षित निकाल

Biggest Upsets of T20 World Cup 2022: आस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील सेमीफायनलचं चित्र आता स्पष्ट झाले आहे. भारतासोबत ग्रुप बी मधून पाकिस्तानच्या संघाने उपांत्य फेरी गाठली आहे तर ग्रुप ए मधून न्यूझीलंड आणि इंग्लंड हे संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरले आहेत. सेमीफायनलचा पहिला सामना 9 नोव्हेंबर रोजी न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. तर, दुसरा सेमीफायनल सामना 10 नोव्हेंबर रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाणार आहे.

यंदाची टी-20 विश्वचषक स्पर्धा अनेक अर्थांनी लक्षवेधी ठरली. या स्पर्धेतील अनपेक्षित निकालांमुळे ही स्पर्धा नेहमीच क्रिकेटप्रेमींच्या लक्षात राहील. या स्पर्धेतील एकूण पाच सामन्यात धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. यातील दोन सामने पात्रता फेरीतील आहेत. तर, उर्वरित तीन सामने सुपर 12 फेरीतील आहेत.

Biggest Upsets of T20 World Cup 2022: पात्रता फेरीतील अनपेक्षित निकाल

टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील सामन्यांपूर्वी पात्रता फेरीतील सामने पार पडले. पात्रता फेरीत श्रीलंका, नेदरलँड्स, नामिबिया, यूएई, झिम्बाब्वे, आयर्लंड, स्कॉटलँड आणि वेस्ट इंडीजच्या संघांना आपली सुपर 12 फेरीचं तिकिट मिळवायचं होतं. पात्रता फेरीच्या पहिल्याच सामन्यात नामिबियाच्या संघाने श्रीलंकेच्या संघाला ५५ धावांनी मात दिली. त्यानंतरचा सर्वात मोठा उलटफेर म्हणजे स्कॉटलँडच्या संघानं निर्णायक सामन्यात वेस्ट इंडीजचा पराभव केला.
या पराभवामुळे वेस्ट इंडिजच्या संघाला पात्रता फेरीतूनच मायदेशी परतावं लावलं.

Biggest Upsets of T20 World Cup 2022: सुपर 12 फेरीतील उलटफेर

सुपर १२ च्या सामन्यांची सुरवातही धमाकेदार झाली. न्यूझीलँडच्या संघाने सुपर १२ च्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव केला आणि खराब रनरेट मुळे ते गुणतालिकेत खूप मागे पडले. त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या संघाला एका रोमहर्षक लढतीत मात दिली. पाकिस्तानच्या खिशात असलेला सामना विराट कोहलीच्या तुफान खेळीमुळे भारताने जिंकला. त्यानंतर छोट्या संघांनी चांगली कामगिरी करत अनपेक्षित विजय मिळवले आणि सेमीफायनलची दौड रोमांचक बनविली.

हे ही वाचा: चित्तथरारक सामन्यात भारताचा पाकिस्तानवर विजय

झिम्बाब्वेने पाकिस्तानला अवघ्या एका धावेनं हरविले

पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात 27 ऑक्टोबर 2022 रोजी पर्थ येथे सुपर 12 फेरीतील सामना खेळला गेला. या सामन्यात झिम्ब्बाब्वे अवघ्या 131 धावांचे आव्हान दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची चांगलीच दमछाक झाली आणि शेवटी त्यांना अवघ्या एका धावेनं पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तानविरुद्ध मिळवलेला विजय हा झिम्बाब्वेसाठी सर्वोत्तम मानला जाईल. हा सामना पाकिस्तानचा संघ एकतर्फी जिंकेल असं सामन्यापूर्वी वाटत होते पण झिब्बाब्वेच्या संघानं पाकिस्तानला हरवून संपूर्ण क्रिडाविश्वाचं लक्ष वेधून घेतलं.

आयर्लंडकडून बलाढ्य इंग्लंडचा पराभव

टी-20 विश्वचषकाच्या 20व्या सामन्यात इंग्लंड आणि आयर्लंडचे संघ एकमेकांशी भिडले होते. आयर्लंडने या सामन्यात चांगली फलंदाजी केली आणि
धावांचे आव्हान ठेवले. या सुपर 12 फेरीतील सामन्यात आयर्लंडनं डकवर्थ लुईच्या नियमांतर्गत इंग्लंडचा पाच धावांनी पराभव केला. यापूर्वीही 2011 च्या विश्वचषकात आयर्लंडनं इंग्लंडचा पराभव केला होता.

नेदरलँड्सनं दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेबाहेर काढलं

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमधील सर्वात अनपेक्षित निकाल सुपर १२ च्या शेवटच्या दिवशी आला. चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या दक्षिण आफ्रिकेला नेदरलँड्सने 13 धावांनी पराभूत केलं आणि या पराभवासह दक्षिण आफ्रिकेचं स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आलं. त्यामुळे पाकिस्तानसाठी सेमीफायनलचे दरवाजे उघडले आणि नेदरलँड्सही पुढच्या विश्वचषकासाठी सुपर १२ मध्ये पात्र ठरला. पाकिस्तानच्या संघानंही त्यांना मिळालेल्या संधीचं सोन केलं. बांगलादेशला नमवून पाकिस्तानच्या संघानं सेमीफायनलमध्ये धडक दिली.

एकूणच या वर्षीच्या अनपेक्षित निकालांमुळे (Biggest Upsets of T20 World Cup 2022) या स्पर्धेतील चुरस वाढली. १३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यानंतर आपल्याला नवीन जगज्जेते मिळतील पण त्यानंतरही या स्पर्धेतील अनपेक्षित निकालांमुळे ही स्पर्धा नेहमीच क्रिकेटप्रेमींच्या लक्षात राहील हे नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *