Big Update on cricketers’ match fees: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी २७ ऑक्टोबर २०२२ रोजी एक अत्यंत महत्वाची घोषणा केली. ही घोषणा होती खेळाडूंच्या मॅच फी बद्दलची. पुरुष आणि महिला खेळाडूंच्या मॅच फी (match fees) मध्ये असणारा फरक आता दूर होणार आहे. यापुढे भारतीय महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंच्या वेतनाच्या बाबतीत कोणताही भेदभाव केला जाणार नाही. सर्वांना समान मॅच फी म्हणजेच वेतन मिळेल, अशी घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी केली आहे. जय शहा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे.
Match Fees: जय शहा यांनी दिली माहिती
जय शहा यांनी ट्विटरवर या बाबत पोस्ट करून माहिती दिली. ते म्हणाले की, भेदभाव दूर करण्यासाठी बीसीसीआयने पहिले पाऊल उचलले आहे. आम्ही महिला क्रिकेटपटूंसाठी वेतन समानता धोरण लागू करत आहोत. आम्ही आता लैंगिक समानतेच्या नव्या युगात प्रवेश करत आहोत. अशा स्थितीत या धोरणांतर्गत आतापासून पुरुष आणि महिला दोघांसाठी समान मॅच फी असेल. यापुढे महिलांनाही पुरुषांइतकीच मॅच फी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Match Fees: पुरुषांचे वेतन
पुरुषांना कसोटी सामन्यासाठी प्रत्येक मॅच (match fees) साठी 15 लाख रुपये मिळतात, तर एकदिवसीय सामन्यासाठी ६ लाख रुपये दिले जातात. टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी पुरुषांना ३ लाख रुपये प्रति सामना अशी मॅच फी देण्यात येते. आता हीच फी (match fees) महिला क्रिकेटपटूंनाही दिली जाणार आहे अशी माहिती जय शहा यांनी दिली आहे. या निर्णयाला पाठिंबा दिल्याबद्दल जय शहा यांनी सर्वोच्च परिषदेचेही आभार मानले आहेत.
महिला आणि पुरुष क्रिकेटमध्ये तुलना केली तर आतापर्यंत ज्येष्ठ महिला क्रिकेटपटूंना सामन्यासाठी प्रतिदिन २० हजार रुपये मिळत होते. ते 19 वर्षाखालील पुरुष क्रिकेटपटूच्या बरोबरीचे होते. तर वरिष्ठ पुरुष खेळाडूंना सरासरी ६० हजार रुपये प्रतिदिन मॅच फी म्हणून मिळतात.
कॅटेगरीमध्येही तफावत
पुरुष क्रिकेटर्सना A कॅटेगरीमध्ये ५ कोटी रुपये वर्षाला मिळतात, तर महिला क्रिकेटर्सना A कॅटेगरीमध्ये केवळ ५० लाख रुपये मिळतात. इथे तब्बल १० पटींचं अंतर आहे. A+ कॅटेगरी असणाऱ्या पुरुष खेळाडूंना वर्षाला ७ कोटी रुपये मिळतात. महिला खेळाडूंना A+ कॅटेगरी नाही. पुरुषांच्या B कॅटेगरीसाठी ३ कोटी, C कॅटेगरीमधील पुरुष क्रिकेटर्सना १ कोटी रुपये वर्षाला मिळतात. तर B कॅटेगरी महिला खेळाडूंना ३० लाख रुपये आणि C कॅटेगरी महिला क्रिकेटर्सना १० लाख रुपये वर्षाला मिळतात. स्त्री आणि पुरुष यांच्या वेतनात (match fees) खूप मोठा फरक होता. पण आता हा भेदभावही दूर होणार आहे.
बीसीसीआयच्या सध्याच्या वार्षिक कराराच्या रचनेनुसार (जे समान राहते), भारतातील सर्वाधिक मानधन घेणार्या महिला क्रिकेटपटू- कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना आणि पूनम यादव- ग्रेड A मध्ये असल्याने 50 लाख रुपये कमावतात, तर ग्रेड B आणि ग्रेड C करार 30 लाख आणि 10 लाख रुपयांचे आहेत. त्या तुलनेत, भारतीय पुरुष संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना A+ श्रेणीमध्ये टाकण्यात आले आहे, ज्यामुळे त्यांना वार्षिक ७ कोटी रुपये मिळतील. A, B आणि C श्रेणीतील लोकांना 5 कोटी, 3 कोटी आणि 1 कोटी मिळतात. भारताचे पुरुष क्रिकेटपटू, अर्थातच, तरीही मॅच फीच्या (match fees) बाबतीत अधिक कमाई करतील कारण ते भारतातील त्यांच्या महिला खेळाडूंच्या तुलनेत अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळतात.
हे ही वाचा: भारताने जिंकला महिला आशिया चषक
समान मॅच फी लागू करणारं पहिलं बोर्ड
दरम्यान, क्रिकेटमध्ये पुरुष आणि महिलांना समान वेतन देण्याचा उपक्रम पहिल्यांदा न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने यावर्षी जुलैमध्ये राबविला होता. त्यांनी महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना समान वेतन देण्याचा निर्णय घेतला होता. एनझेडसी आणि 6 मोठ्या असोसिएशनमध्ये याबाबत करारही झाला होता. हा करार पहिल्या पाच वर्षांसाठी करण्यात आला होता. याअंतर्गत आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह देशांतर्गत क्रिकेटपटूंनाही सर्व स्पर्धांमध्ये होणाऱ्या सामन्यांसाठी समान शुल्क मिळेल.
महिला क्रिकेटची चांगली कामगिरी
पुरुष आणि महिला खेळाडूंसाठी समान मॅच फी लागू केल्याबद्दल भारतीय क्रिकेट मधील अनेक दिग्गजांनी, खेळाडूंनी आणि चाहत्यांनी बीसीसीआयचे कौतुक केले आहे. BCCI चा निर्णय हा निर्णय भारतातील महिला क्रिकेटसाठी एक महत्त्वाची घटना आहे.
भारतातील महिला क्रिकेट चांगली प्रगती करीत आहे. भारतीय महिला संघाने मिताली राज च्या नेतृत्वाखाली खेळताना 2017 च्या महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. या वर्षी ऑगस्टमध्ये, त्यांनी 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आणि सप्टेंबर महिन्यात, इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडच्या संघाचा 3-0 असा ऐतिहासिक पराभव करून एकदिवसीय मालिका जिंकली. या महिन्याच्या सुरुवातीला बांगलादेशमध्ये झालेल्या आशिया कप स्पर्धेतही संघाने उत्तम कामगिरी केली आणि भारताने सातव्यांदा महिला जिंकला. पुढील वर्षी मार्चमध्ये, बीसीसीआय महिला आयपीएलची उद्घाटन आवृत्ती सुरू करणार आहे आणि भारतीय महिला संघाची प्रगती आणि कामगिरी पहाता महिला आयपीएललाही चांगला प्रतिसाद अपेक्षित आहे. त्यामुळे बोर्डाने घेतलेला हा निर्णय महिला खेळाडूंना उत्साह देणारा ठरेल.