Maine Pyar Kiya Cast: बडजात्या कुटुंबाचे राजश्री प्रोडक्शन बॉलिवूड मधल्या अग्रगण्य प्रोडक्शन हाऊस पैकी एक मोठं नाव आहे. या प्रोडक्शन हाऊसची सुरुवात सुरज बडजात्यांचे आजोबा दिवंगत ताराचंद बडजात्या यांनी केली होती. संपूर्ण कुटुंबाबरोबर पाहता येतील असे एकाहून एक सरस कौटुंबिक चित्रपट या प्रोडक्शन हाऊसने दिलेले आहेत. हा किस्सा आहे त्यांच्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाच्या कास्टिंग बाबतचा (Maine Pyar Kiya Cast). १९८९ मध्ये या चित्रपटाद्वारे सुरज बडजात्या यांनी दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरवात केली. त्या आधी सुरज बडजात्या यांनी मेहश भट्ट यांच्या चित्रपटात असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले होते.
सुरज बडजात्या यांना व्हायचं होतं दिग्दर्शक
सुरज बडजात्या यांना पहिल्यापासूनच दिग्दर्शक व्हायचं होतं. याची सुरुवात त्यांनी गोष्ट लिहिण्यापासून केली. त्यांनी चित्रपटासाठी एक कथा लिहिली होती, पण त्यांच्या वडिलांनी त्यांना एक सल्ला दिला, की पहिला चित्रपट हा रोमॅन्टिक ड्रामा असायला हवा. त्यानंतर सुरज यांनी ‘मैने प्यार किया’ची कथा लिहिली. पण त्यांनी ही लव्हस्टोरी इंग्रजीत लिहिली होती, त्यांच्या वडिलांनी त्यांना ही लव्हस्टोरी हिंदीत लिहून घेऊन ये असं सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी जमेल तसं हिंदीत लिहून स्क्रिप्ट वडिलांना दिली होती.
हे ही वाचा: ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ सोहळा मुंबईत संपन्न
Maine Pyar Kiya Cast: अभिनेत्रीचा शोध
‘मैने प्यार किया’साठी अभिनेत्रीचा (Maine Pyar Kiya Cast) शोध सुरू होता. सुरज यांनी अनेक अभिनय शाळांमध्येही जाऊन काही ऑडिशन्स घेतल्या होत्या त्यावेळी अभिनेत्री निलम लोकप्रिय होती. या भूमिकेसाठी ती योग्य आहे, असं त्यांना वाटलं होतं. ती चेन्नईत सनी देओलसोबत एका चित्रपटासाठी शूटिंग करत होती. निलमशी बोलणी करण्यासाठी सूरज यांनी चेन्नईला जाण्यासाठी विमानाचं तिकिटही बूक केलं होतं. पण त्यांच्या वडिलांचा फोन आला की, इतक्यात चेन्नईला जाऊ नको, एक मुलगी आहे, जिचा फोटो एका मासिकावर छापण्यात आलाय. तू तिला भेटून घे. यानंतर सूरज यांनी भाग्यश्रीची भेट घेतली (Maine Pyar Kiya Cast) आणि तिलाच या चित्रपटासाठी साईन करण्यात आले.
सलमान खान आणि भाग्यश्री स्टारर ‘मैने प्यार किया’ या चित्रपटात निरागस प्रेमाची कहाणी प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचली. या चित्रपटाचा प्रभाव इतका होता की आजही लोक या चित्रपटाला विसरू शकलेले नाहीत.