fbpx

बीसीसीआय करीत आहे वूमन आयपीएलची तयारी

पुढील वर्षात म्हणजेच २०२३ पासून बीसीसीआय महिला आयपीएलचे आयोजन करणार आहे.

5 संघ, 2 ठिकाणे, 20 सामने

मिळालेल्या माहिती प्रमाणे महिला आयपीएलच्या (Women’s IPL) पहिल्या आवृत्तीत 5 संघ सहभागी होतील. या संघांमध्ये एकूण 20 सामने खेळवण्याचा विचार असून दोन ठिकाणी या सामन्यांचे आयोजन करण्याचा विचार सुरु आहे.

प्लेइंग इलेव्हन

या स्पर्धेतल्या पहिल्या हंगामासाठी साठी बीसीसीआय पाच संघांचा विचार करत आहे. महिला आयपीएल प्लेइंग इलेव्हनमध्ये पाच परदेशी खेळाडूंना परवानगी असेल असे वृत्त आहे. प्लेइंग इलेव्हनमधील जास्तीत जास्त चार परदेशी खेळाडू आयसीसीच्या पूर्ण सदस्य राष्ट्रांचे असू शकतात, तर उर्वरित एक असोसिएट राष्ट्रातील असू शकतो. प्लेइंग इलेव्हन स्ट्रक्चर वर सध्या विचार केला जात आहे.

संघ विभागणी

आयपीएल संघ कुठल्या आधारावर बनवावेत यावरही सध्या विचार होत आहे. संघ झोन (Zone based) किंवा शहरांच्या (City based) आधारावर तयार करण्याचे पर्याय बीबीसीआय कडे आहेत. झोन प्रमाणे विभागणी झाल्यास उत्तर (धर्मशाला/जम्मू), दक्षिण (कोची/विझाग), मध्य (इंदूर/नागपूर/रायपूर), पूर्व (रांची/कटक), उत्तर पूर्व ( गुवाहाटी) आणि पश्चिम (पुणे/राजकोट) अशी विभागणी असू शकते आणि शहरानुसार विभागणी केल्यास अहमदाबाद, दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, कोलकाता अशी विद्यमान पुरुषांच्या आयपीएल संघांप्रमाणे विभागणी होऊ शकते. स्थळांच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय आयपीएलचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे पदाधिकारी घेतील.

स्पर्धेचे स्वरूप

लीग स्टेज मध्ये आयपीएलमध्ये संघ दोनदा एकमेकांशी खेळू शकतात, ज्यामध्ये गुणतालिकेत अव्वल असणारे संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे संघ एलिमिनेटर खेळतील.

महिला आयपीएल स्पर्धा ‘कारवाँ’ शैली (caravan style) मध्ये खेळविण्याच्याची विचार केला जात आहे ज्यामध्ये एका ठिकाणी अनेक सामने खेळले जातील आणि नंतर संपूर्ण स्पर्धा वेगळ्या ठिकाणी स्थलांतरित केली जाईल. यापूर्वी भारतातल्या वाढत्या कोविड प्रभावामुळे काही सामने खेळल्यानंतर आयपीएल 2021 यूएईमध्ये स्थलांतरित करण्यात आली होती.

केवळ 20 लीग सामने विचारात घेऊन, WIPL साठी प्रत्येक हंगामात दोन ठिकाणे निवडली जातील. उद्घाटनाचा 2023 हंगाम दोन ठिकाणी खेळवला जाऊ शकतो, 2024 हंगाम इतर दोन ठिकाणी आणि 2025 चा हंगाम 2023 हंगामातील उर्वरित एक प्लस वन स्थळांवर खेळला जाऊ शकतो.

या स्पर्धेसाठी T20 महिला विश्वचषकानंतर (T20 Women’s World Cup) आणि पुरुषांची आयपीएल (Men’s IPL) सुरू होण्यापूर्वीच्या दरम्यान तात्पुरती विंडो मार्च 2023 मध्ये सेट केली गेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *