BaapManus Trailer Released: पुष्कर जोग आणि अनुषा दांडेकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बापमाणूस’ या चित्रपटाचा ट्रेलर महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर रिलीज (BaapManus Trailer Released) करण्यात आला आहे. वडीलमुलीच्या अतूट नात्याची गुंफण या ट्रेलरमध्ये बघायला मिळतेय.
BaapManus Trailer Released: फादर्स डेला होणार चित्रपट प्रदर्शित
लेकीसाठी तिचा बाबा हा कायमच बापमाणूस असतो… अशी या चित्रपटाची टॅगलाइन आहे. यावर्षी फादर्स डे च्या मुहूर्तावर म्हणजेच १६ जून २०२३ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटातून चिमुकली किया इंगळे मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवतेय. किया सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. ट्रेलरमध्ये पुष्कर, अनुषा आणि कियासह कुशल बद्रिकेचीही झलक पाहायला मिळतेय.
हे ही वाचा: ‘पठाण’ अवतार
BaapManus Trailer Released: दसऱ्याच्या मुहूर्तावर झाली होती चित्रपटाची घोषणा
पुष्कर जोग आणि अनुषा दांडेकर पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र दिसणार आहेत. अनुषाने बऱ्याच वर्षांनी मराठी चित्रपटात काम केले आहे. निर्माते आनंद पंडित आणि पुष्कर जोग यांच्या निर्मिती संस्था अनुक्रमे आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि गूसबम्प्स एंटरटेनमेंट यांनी एकत्रित निर्मिती करत असलेल्या ‘बापमाणूस’ या चौथ्या चित्रपटाची घोषणा गेल्यावर्षी दसऱ्याच्या मुहूर्चावर करण्यात आली होती. या चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये पूर्ण झाले.
‘बापमाणूस’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा योगेश फुलपगार यांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित, रूपा पंडित आणि पुष्कर जोग आहेत तर सह निर्माते वैशाल शाह, राहुल व्ही दुबे हे आहेत.