Epic Movie Avatar – The Way of Water: ‘अवतार – द वे ऑफ वॉटर’ 16 डिसेंबरला होणार रिलीज

Avatar – The Way of Water: जेम्स कॅमरून यांचा बहुचर्चित आणि बहूप्रतिक्षित चित्रपट ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ (Avatar – The Way of Water) लवकरच जगभर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा नवीन ट्रेलर निर्मात्यांनी अवतारच्या अधिकृत ट्विटर हँडल @officialavatar वर 2 नोव्हेंबर, बुधवारी रिलीज केला. डिसेंबरच्या मध्यात हा चित्रपट थिएटरच्या पडद्यावर दाखल होणार आहे. हा चित्रपट जेम्स कॅमेरॉन यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे आणि 16 डिसेंबर 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अवतारचा सिक्वेल येण्यासाठी एका दशकाहून अधिक कालावधी लागला. २००९ साली आलेल्या ‘अवतार’ने सर्वाधिक कमाईचा इतिहास रचला होता. एक अद्भुत विश्व या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळालं होतं. आता तब्बल १२ वर्षांनी या चित्रपटाचा दूसरा भाग येत आहे तरी प्रेक्षक यासाठी अजूनही प्रचंड उत्सुक आहेत. गेल्याच महिन्यात २००९ साली आलेला ‘अवतार’ चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित केला होता आणि या चित्रपटाने पुन्हा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई केली.

हे ही वाचा: ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ची घोषणा

निळ्या महासागराचे मनमोहक दृश्य आणि कथेची झलक

जेव्हा या दुसऱ्या भागाचा पहिला ट्रेलर आला होता तेव्हा तर त्यात एकही संवाद नव्हता तरी तो ट्रेलर प्रेक्षकांना आवडला होता. त्यातले व्हिज्यूअल्स, स्पेशल इफेक्ट हे खरंच डोळ्यांचं पारणं फेडणारे होते. आता याच दुसऱ्या भागाचा आणखी एक ट्रेलर नुकताचा प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये आता नवीन भागात समोर येणाऱ्या कथेची हलकीशी झलक आपल्याला पाहायला मिळत आहे. सली परिवाराच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी, आणि इतरही बऱ्याच गोष्टींचा उलगडा या नवीन भागातून होणार आहे असं ट्रेलरमधून दिसत आहे. या अडचणींवर सली कुटुंब कशापद्धतीने मात करेल हेदेखील ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’मध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं. Pandora च्या चमकदार निळ्या महासागराचे मनमोहक चित्रण या ट्रेलर मध्ये दिसत आहे.

“16 डिसेंबर रोजी, Pandora वर परत या. अगदी नवीन ट्रेलर पहा आणि 3D मध्ये #AvatarTheWayOfWater चा अनुभव घ्या,” असे अवतार फ्रेंचायझीच्या अधिकृत ट्विटर हँडलने ट्रेलर रिलीज करताना म्हटले आहे.

Avatar – The Way of Water: भारतात सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार

पीटीआय ने दिलेल्या वृतानुसार, हा एपिक सायन्स फिक्शन चित्रपट 20th सेंचुरी स्टुडिओज इंडियाद्वारे भारतात इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम या सहा भाषांमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाईल.

अवतार चे पुढील भाग

‘अवतार’चे आणखी ३ भाग येणार असल्याचीसुद्धा चर्चा आहे. तिसरा भाग ‘अवतार : द सिड बेअरेर’ हा २०२४ मध्ये प्रदर्शित होणार अशी चर्चा आहे तर पुढचे २ भाग २०२६ आणि २०२८ या वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘अवतार’ आणि ‘टायटॅनिक’ या चित्रपटाबरोबरच जेम्स कॅमरून यांनी प्रसिद्ध सीरिज ‘टर्मिनेटर’च्या पहिल्या २ भागांचं दिग्दर्शन केलं आहे. शिवाय १९८६ साली ‘एलियन्स’ हा सायन्स फिक्शन हा चित्रपटही जेम्स कॅमरून यांनी काढला होता जो प्रचंड यशस्वी झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *