Asia Cup 2023 : यावर्षी सप्टेंबरमध्ये होणारी एशिया कप स्पर्धा पाकिस्तानमध्येच होऊ शकते. भारताने पाकिस्तान मध्ये खेळण्यास आधीच नकार दिला आहे त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यावर तोडगा काढला आहे. पीसीबी ESPN क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, स्पर्धेतील बहुतांश सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. पण भारतीय संघाचे सर्व सामने यूएई, ओमान किंवा श्रीलंका यापैकी कोणत्याही एका ठिकाणी हलवले जाऊ शकतात. या स्पर्धेत भारत-पाकिस्तान 3 वेळा आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
Asia Cup 2023 : सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार एशिया कप
यावेळी एशिया कप (Asia Cup) स्पर्धा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. 13 दिवस चालणाऱ्या 6 संघांच्या स्पर्धेत अंतिम सामन्यासह एकूण 13 सामने होतील. भारत आणि पाकिस्तान हे दोन्हीही संघ एकाच गटात आहेत. पात्रता पूर्ण केल्यानंतर आणखी एक संघ त्यांच्यासोबत या गटात पोहोचेल. तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान दुसऱ्या गटात आहेत.
भारताचे सामने न्यूट्रल ठिकाणी होणार
एशिया कप (Asia Cup) स्पर्धेच्या प्राथमिक टप्प्यात भारतीय संघ 2 सामने खेळणार आहे. एकच सामना जिंकल्यानंतर संघ सुपर-4 टप्प्यात पोहोचेल, जिथे त्यांना 3 सामने खेळावे लागतील. जर भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचली तर टीम या स्पर्धेत एकूण 6 सामने खेळेल. भारत अंतिम फेरीत पोहोचल्यास तो सामनाही न्यूट्रल ठिकाणी हलवला जाईल.
इंग्लंडच्या नावाचाही न्यूट्रल व्हेन्यूमध्ये समावेश
यूएई, ओमान आणि श्रीलंका यांच्याशिवाय इंग्लंडचेही नाव न्यूट्रल ठिकाणी येत आहे. कारण इंग्लंडमध्ये होणारा भारत-पाक सामना पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने पोहोचू शकतात. पण इंग्लंडला यजमानपद मिळण्याची आशा फारशी कमी आहे, कारण एशिया कप (Asia Cup) आणि आयपीएलचे सामने सप्टेंबरमध्ये यूएई आणि ओमानमध्ये आयोजित केले गेले आहेत. अशा स्थितीत आशिया खंडातील केवळ एका देशातच भारताचे सामने होणे अपेक्षित आहे.
हे ही वाचा : महिला क्रिकेट लीगचे यश
ACC च्या बैठकीत निर्णय होऊ शकला नाही
गेल्या आठवड्यात आशिया चषक पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यासाठी आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) बैठक घेतली. या बैठकीत अंतिम ठिकाण निश्चित होऊ शकले नाही. मात्र या बैठकीनंतरही पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि एसीसी सदस्यांमध्ये अनौपचारिक बैठक झाली. या बैठकांमध्ये प्रश्न सोडवण्यात आला.
वृत्तानुसार, आशिया चषक स्पर्धेत भारत वगळता उर्वरित 5 देशांचे सामने केवळ पाकिस्तानमध्येच होणार आहेत. पण भारतीय संघाचे सामने न्यूट्रल ठिकाणी होणार आहेत.
भारत-पाकिस्तानमध्ये होऊ शकतात 3 सामने
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या या स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. भारतीय संघाच्या गटात पाकिस्तानशिवाय एक संघ पात्रता फेरीतून पोहोचेल. तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान दुसऱ्या गटात राहतील. दोन्ही गटातील टॉप-2 संघ सुपर-4 टप्प्यात पोहोचतील.
भारत आणि पाकिस्तान सुपर-4 टप्प्यात पोहोचल्यास, दोन्ही संघ पुन्हा एकदा एकमेकांशी भिडतील. सुपर-4 टप्प्यातील टॉप-2 संघ अंतिम फेरीत पोहोचतील. जर फक्त भारत आणि पाकिस्तानने अव्वल-2 स्थान मिळवले तर दोन्ही संघ अंतिम फेरीतही आमनेसामने येतील. अशा प्रकारे दोन्ही संघ या स्पर्धेत 3 वेळा भिडतील.