Aryan Khan directed SRK: शाहरुख खानने एका लक्झरी ब्रँडच्या जाहिरातीचा टीझर रिलीज केला आहे. तर, या जाहिरातीत शाहरुखचे दिग्दर्शन त्याचाच मुलगा आर्यन खान याने केले आहे.
बॉलीवूड इंडस्ट्रीचा ‘किंग’ अर्थात शाहरुख खान संपत्ती, प्रसिद्धी आणि चाहत्यांच्या प्रेमाच्या बाबतीतही राजा आहे. अभिनेत्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’च्या यशाने हे सिद्ध केले की आजही जगभरातील लोक शाहरुखला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्याचबरोबर आता शाहरुखचा मुलगा आर्यन खानही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या मार्गावर निघाला आहे. किंग खानने त्याचा मुलगा आर्यन खान दिग्दर्शित एका लक्झरी ब्रँडच्या नवीन जाहिरातीचा टीझर शेअर केला आहे. अशाप्रकारे आर्यन या जाहिरातीद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करीत आहे, ज्यामध्ये त्याचे वडील शाहरुख दिसणार आहेत.
जाहिरातीच्या टीझरने चाहत्यांची वाढवली उत्सुकता
जाहिरातीच्या टीझरमध्ये शाहरुख खान अॅक्शनपॅक लूकमध्ये दिसत आहे, ज्याला पाहिल्यानंतर चाहते संपूर्ण व्हिडिओसाठी खूप उत्सुक झाले आहेत. त्याचवेळी, हे शेअर करताना शाहरुखने कॅप्शनमधून खुलासा केला आहे की, जाहिरातीचा संपूर्ण व्हिडिओ उद्या प्रदर्शित केला जाईल.
हे ही वाचा : विद्युत जामवालच्या IB71 चा दमदार ट्रेलर प्रदर्शित
शाहरुख खानवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला
शाहरुख खानने अभिनेता म्हणून खूप प्रेम कमावले आहे. कडक उन्हाळा असूनही, त्याचे चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी मुंबईतील त्याच्या निवासस्थानाबाहेर जमतात. त्याच्या चाहत्यांकडून त्याला मिळत असलेल्या प्रेमाबद्दल अभिनेता कृतज्ञ आहे आणि अनेकदा तो स्वतःला ‘लकी’ म्हणताना दिसतो. आपली वार्षिक परंपरा सुरू ठेवत शाहरुखने मन्नतच्या बाहेर त्याच्या चाहत्यांना ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा दिल्या.
शाहरुख खानचे आगामी प्रोजेक्ट्स
शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर तो लवकरच अॅटली दिग्दर्शित ‘जवान’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंग सेटवरील अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, जे पाहून चाहत्यांचा उत्साह आणखीनच वाढला आहे. याशिवाय SRK राजकुमार हिरानीच्या ‘डंकी’ या चित्रपटातही दिसणार आहे, ज्यामध्ये त्याच्या विरुद्ध अभिनेत्री तापसी पन्नू दिसणार आहे. या नव्या जोडीला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.