Arjun Tendulkar IPL debut : अर्जुन तेंडुलकरचे स्वप्न साकार, मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण

Arjun Tendulkar IPL debut : दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा मुंबई इंडियन्सने प्रथमच प्लेइंग-11 मध्ये समावेश (Arjun Tendulkar IPL debut) केला. अर्जुनला आयपीएलच्या 16व्या हंगामातील 22व्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. अर्जुनला 2021 मध्ये मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा 20 लाख रुपयांना खरेदी केले होते. त्यानंतर 2022 मध्ये त्याला 25 लाख रुपयांमध्ये संघात समाविष्ट करण्यात आले. सलग दोन हंगाम बेंचवर बसल्यानंतर त्याला संधी मिळाली.

मुंबई इंडियन्सचा कार्यवाहक कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून कोलकाताविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांपासून अर्जुन सतत वडील सचिन तेंडुलकरसोबत ट्रेनिंग सेशनमध्ये दिसत होता. अर्जुन डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी करतो. याआधी तो फर्स्ट क्लास आणि लिस्ट ए मॅच खेळला आहे. आता त्याचे आयपीएलमध्ये खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

Arjun Tendulkar IPL debut : अर्जुनचे दमदार पदार्पण

अर्जुनला तब्बल दोन वर्षांनी आज आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. अर्जुनने सुरुवातीला दोन षटके टाकली आणि त्याने १७ धावा दिल्या. एकही विकेट मिळवण्यात त्याला अपयश आले. अर्जुनचा हा पहिलाच सामना होता, तरीही अर्जुनने अन्य गोलंदाजांपेक्षा चांगली गोलंदाजी केली. अर्जुनचा हा पहिलाच सामना होता. पण या सामन्यात त्याला विकेट मिळवता आला नाही. आता पुढच्या सामन्यात अर्जुनला मुबंई इंडियन्सचा संघ पुन्हा संधी देईल की नाही, याची उत्सुकता सर्व चाहत्यांना नक्कीच लागलेली असेल.

हे ही वाचा : रिंकू सिंगने खेचून आणला अशक्यप्राय विजय

अर्जुन तेंडुलकरची कारकीर्द

अर्जुनने 2021 मध्ये हरियाणाविरुद्ध पहिल्यांदाच मुंबईकडून टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये त्याने गोव्यासाठी लिस्ट अ मध्ये पदार्पण केले आणि पुढील महिन्यात राजस्थान विरुद्ध रणजी ट्रॉफी खेळली. अर्जुनने सात प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 223 धावा करण्यासोबतच 12 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच वेळी, त्याने सात लिस्ट ए सामन्यांमध्ये आठ विकेट्स आणि नऊ टी-20 सामन्यांमध्ये 12 बळी घेतले आहेत.

अजब योगायोग

तब्बल दोन वर्षे वाट पाहिल्यावर अर्जुनला अखेर आज संधी मिळाली. पण हा सामना सुरु असताना एक अजब योगायोग पाहायला मिळाला. अर्जुनला आज केकेआरविरुद्धच्या सामन्यात पदार्पण करण्याची संधी दिली. त्यानंतर अर्जुनला यावेळी पहिले षटक टाकण्यातही देण्यात आले. या सर्व गोष्टींमध्ये एक अजब योगायोग असल्याचे आता समोर आले आहे.

सचिनने आयपीएलमधील आपले पहिले षटक हे एप्रिल २००९ मध्ये टाकले होते. अर्जुनने आपले पहिले षटक एप्रिल २०२३ मध्ये टाकले. या दोघांनीही आपले आयपीएलमधील पहिले षटक हे केकेआर या संघाविरुद्धच टाकल्याचे आता समोर आले आहे. सर्वात महत्वाची गोष्ट तर त्याच्या पुढे आहे. या दोघांनी आपल्या पहिल्या षटकात सारख्याच धावा दिल्याचेही आता समोर आले आहे. सचिनने २००९ साली जेव्हा केकेआरविरुद्ध पहिले षटक टाकले तेव्हा त्याने पाच धावा दिल्या होत्या. अर्जुनने आपले पहिले षटक जेव्हा टाकले तेव्हा त्यानेही चक्क पाचच धावा दिल्या होत्या. त्यामुळे सचिन आणि अर्जुन यांच्यांमध्ये हा असा अजब योगायोग असल्याचे पाहायला मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *