दाढी हो तो बच्चन जैसी…

‘मुछे हो तो नथ्थूलाल जैसी वर्ना ना हो..’ अमिताभ बच्चन यांचा शराबी चित्रपटातला हा डायलॉग फारच गाजला. चित्रपटात नथ्थूलालच्या मिशांची तारीफ करणाऱ्या या महानायकाची खऱ्या आयुष्यातली फ्रेंच कट दाढी एक स्टाईल स्टेट्स बनली आहे. बच्चन साहेबांच्या आयकॉनिक लुकचा ती एक अविभाज्य भाग बनली आहे. ही फ्रेंच कट दाढी अमिताभ यांना इतकी सूट होते की ‘मुछे हो तो नथ्थूलाल जैसी’ या धर्तीवर ‘दाढी हो तो बच्चन जैसी’ असेही म्हणावे लागेल. त्यांया या दाढीचा किस्साही मनोरंजक आहे.

मात्र नेहमीच चर्चा बॉलिवूडचे महानायक म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अमिताभ बच्चन यांचा देशातच नाही तर जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर स्वतःची वेगळी छाप सोडली आहे. आज ७९ वर्षांचे असूनही अमिताभ बच्चन चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. त्यांचा उत्साह नेहमीच पाहण्यासारखा असतो. पण अमिताभ बच्चन यांच्याकडे पाहिलं तर एक बाब प्रत्येक ठिकाणी समान असते आणि ती म्हणजे त्यांची फ्रेंच कट दाढी. ज्याची अनेकांनी कॉपी केली आहे. पण अमिताभ बच्चन कायम अशी फ्रेंच कट दाढी का ठेवतात याचा खुलासा आता झाला आहे.

अमिताभ बच्चन यांची स्टाईल

बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांचा येत्या ११ ऑक्टोबरला ८० वा वाढदिवस आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर स्वतःची वेगळी छाप सोडली आहे. रुपेरी पडद्यावर ज्यांच्या अभिनयाची जादू आजही कायम आहे. त्यांचा आवाज, देहबोली आणि हेअर स्टाईल प्रसिद्ध आहेतच पण त्याच बरोबर प्रसिद्ध आहे ती त्यांची फ्रेंच कट दाढीही. अमिताभ बच्चन यांचा देशातच नाही तर जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. बिग बींचे अनेक चहाते त्यांची स्टाईल कॉपी करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. फक्त अमिताभ बच्चन यांनी ठेवली म्हणून फ्रेंच कट दाढी ठेवणारे, मुळात काळी असली तरी मुद्दाम ती पांढरी रंगवून घेणारेही चहाते आजवर आपण पाहिले आहेत. यावरून अमिताभ यांची फ्रेंच कट दाढीची स्टाईल किती पॉप्युलर आहे याचा आपल्याला अंदाज येतो. पण बिग बी फ्रेंच कट दाढी ठेवण्यामागे एक खूपच रंजक किस्सा आहे. विशेष म्हणजे हा किस्सा त्यांच्या कामाशीच संबंधीत आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांना एका चित्रपटासाठी अशाप्रकारे फ्रेंच कट दाढी ठेवण्याचा सल्ला एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिला होता. बिग बींना हा लुक इतका भावला की त्या चित्रपटानंतरही त्यांनी तो आजवर कायम ठेवला आहे.

काय आहे हा किस्सा?

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक हीट चित्रपट देणारे दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी अलिकडेच त्यांचं पहिलं पुस्तक ‘द स्ट्रेंजर इन द मिरर’ प्रकाशित केलं. या पुस्तकात त्यांनी चित्रपटसृष्टीत आलेले त्यांचे अनेक अनुभव लिहिले आहेत ज्यात एक किस्सा अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधीत आहे.

दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी त्यांच्या पुस्तकात ‘अक्स’ चित्रपटाच्या वेळचा एक किस्सा सांगितला आहे. या पुस्तकात त्यांनी म्हटलंय, “मी बच्चनजींना नेहमी क्लिन शेवमध्ये पाहिलं होतं. पण मला वाटलं या चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी त्यांना फ्रेंच कट दाढी चांगली दिसेल. यावर ४-५ महिने चर्चा झाली आणि त्यानंतर जेव्हा ट्रायल झाली तेव्हा अमिताभ बच्चन यांना तो लूक आवडला. त्यांनी या लुकसाठी होकार दिला.” ‘अक्स’ चित्रपटात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिस वर अपेक्षित यश मिळाले नाही पण या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांचा दाढीचा लूक मात्र कायम तसाच ठेवला जो आजपर्यंत बदलला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *