fbpx

Adipurush release postponed: ‘आदिपुरुष’च्या प्रदर्शनाची तारीख बदलली, चाहते म्हणतात – लूक आणि VFX बदला, तारीख नाही

Adipurush release postponed: ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट आता 12 जानेवारी 2023 रोजी नाही तर 16 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लुक्स आणि VFX वर प्रचंड टीका

चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटातील पात्रांचे लुक्स आणि VFX यांवर प्रचंड टीका झाली. सोशल मीडियावर त्याचा खरपूस समाचार घेतला गेला. चित्रपटातील रावण आणि हनुमानाच्या लूक, सीतेचे कपडे, रावणाचे वाहन या सह अनेक गोष्टींना ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर आता चित्रपटाच्या टीमने व्हिएफएक्सवर आणखी मेहनत घेण्याचा निर्णय घेतला आहे. खुद्द दिग्दर्शक ओम राऊतने याविषयीची माहिती दिली. यासाठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पाच महिन्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे.

प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आणि सध्या सुरू असलेल्या वादांमुळे सैफ अली खान आणि प्रभास स्टारर ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. हा चित्रपट आधी 12 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता, पण आता दिग्दर्शक ओम राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हा चित्रपट 16 जून 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार (Adipurush release postponed) असल्याचे म्हटले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यामागचे कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही, मात्र ओमने याबाबत एक संकेत दिला आहे.

हे ही वाचा: ‘अवतार – द वे ऑफ वॉटर’ 16 डिसेंबरला होणार रिलीज

Adipurush release postponed: रिलीजची तारीख का बदलली आहे?

ओम राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘आदिपुरुष’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर भगवान श्री रामावरील आमची भक्ती आणि आमच्या गौरवशाली इतिहास आणि संस्कृतीशी असलेल्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. आदिपुरुषांशी निगडित लोकांनी प्रेक्षकांना एक अप्रतिम अनुभव देण्यासाठी आणखी थोडा वेळ देण्याची गरज आहे.’

‘जय श्री राम, आदिपुरुष हा केवळ चित्रपट नाही तर प्रभू श्री राम यांच्याप्रती असलेली आमची श्रद्धा आणि आपल्या संस्कृती, इतिहासाप्रती असलेली वचनबद्धता आहे. प्रेक्षकांना चित्रपटाचा चांगला अनुभव देता यावा यासाठी आम्हाला चित्रपटावर आणखी काम करण्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. देशाला अभिमान वाटेल असा चित्रपट बनवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. तुमचं प्रेम, तुमची साथ मिळाली तर यात आम्ही नक्कीच यशस्वी होऊ. आदिपुरुष आता 16 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे’, असं ट्विट ओम राऊतने केलं.

Adipurush release postponed: जनतेची प्रतिक्रिया कशी आहे?

रिलीज डेट बदलणाऱ्या या पोस्टवर लोकांच्या प्रतिक्रिया फारशा सकारात्मक आलेल्या नाहीत. एका युजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले – सर्व प्रथम, प्रभास अण्णांसह प्रत्येकाचा लुक आणि पोशाख बदला. दुसऱ्या यूजरने हनुमान आणि रावणाचे लुक्स बदलण्याची सूचना केली. आणखी एका यूजरने कमेंट करताना हा चांगला निर्णय असून VFX आणि संकल्पनेवर काम करण्याची गरज आहे असे सुचविले आहे. चित्रपटातील पात्रांसाठी लेदरसारखे पोशाख परिधान करण्यावरूनही बराच वाद झाला होता. याशिवाय रावणाचा लूक सर्वाधिक ट्रोलिंगचा बळी ठरला.

आदिपुरुष रामायण या पौराणिक कथेवर आधारित या चित्रपटात प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सनॉन यांच्या मुख्य भूमिका आहेत. यामध्ये प्रभासने प्रभू रामचंद्र, क्रितीने सीता आणि सैफने रावणाची भूमिका साकारली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *