Adah Sharma In The Game Of Girgit : अदा शर्मा (Adah Sharma) आज म्हणजेच ११ मी रोजी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. अदा शर्माचा जन्म 11 मे 1992 रोजी मुंबईच्या स्वप्नांच्या शहरात झाला. अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओंमुळे नेहमीच चर्चेत असते. 2008 मध्ये विक्रम भट्टच्या हॉरर फिल्म 1920 मधून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात करणाऱ्या अदाला अनेक वेळा नकारांचा सामना करावा लागला, परंतु तिने कधीही हार मानली नाही.
‘द केरला स्टोरी’ मुळे चर्चेत
‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे सध्या अदा शर्मा (Adah Sharma) चांगलीच चर्चेत आली आहे. यामध्ये तिने ‘शालिनी उन्नीकृष्णन’ हे पात्र साकारले असून तिच्या अभिनयाचे कौतुक करण्यात येत आहे. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या विक्रम भट्ट यांच्या ‘१९२०’ या हॉरर चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. ‘द केरला स्टोरी’ सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करीत असून अदा शर्माकडेही अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत.
हे ही वाचा: प्रा. प्रज्ञा पंडित यांच्या ५ पुस्तकांचे शिरीष काणेकर यांच्या हस्ते प्रकाशन
अदा शर्मा एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत
अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) आता ‘द गेम ऑफ गिरगिट’ या चित्रपटातून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात अदा एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटाची निर्मिती गंधार फिल्म्स ॲण्ड स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड यांनी केली असून दिग्दर्शन ‘हेट स्टोरी-२’ फेम विशाल पंड्या यांनी केले आहे. या चित्रपटात अदासोबत मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे मुख्य भूमिका साकारणार आहे.
Adah Sharma In The Game Of Girgit : ‘ब्लू व्हेल गेम’ खेळावर आधारित
‘द गेम ऑफ गिरगिट’च्या निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाची कथा ‘ब्लू व्हेल गेम’ खेळावर आधारित आहे. हा ऑनलाइन खेळ मध्यंतरी तरुणाईमध्ये खूप लोकप्रिय झाला होता. गुरुवारी या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले. “‘द गेम ऑफ गिरगिट’मध्ये मी भोपाळमधील पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट ‘ब्लू व्हेल’ गेमवर आधारित असून मी साकारत असलेले पात्र ‘गायत्री भार्गव’ ही संपूर्ण केस सोडवणार आहे. याआधी ‘कमांडो’ चित्रपटात सुद्धा मी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली आहे त्यामधील ‘भावना रेड्डी’ ही भूमिका खूप लोकप्रिय झाली होती,” असे अदा शर्मा म्हणाली.
श्रेयस तळपदे साकारणार अॅप डेव्हलपरची भूमिका
मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे या चित्रपटात अॅप डेव्हलपरची भूमिका करणार आहे. तो म्हणाला, या चित्रपटातून आजकालची लहान मुले आणि तरुणपिढीला एका संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. तसेच दिग्दर्शक विशाल पंड्या म्हणाले, हा चित्रपट मोबाईल फोनमधील अॅप्सचा अतिवापर करणे, माणसाच्या जीवनात कसे धोकादायक ठरु शकते यावर आधारित आहे.