तुमचं ‘आधार कार्ड’ दहा वर्ष जुनं असेल तर… UIDAI ची महत्त्वाची सूचना

भारतीयांसाठी महत्त्वाच्या ओळखीच्या कागदपत्रांमध्ये ‘आधार कार्ड’ (Aadhar Card) हा सर्वात महत्त्वाचा दस्तावेज मानला जातो. आधार कार्ड शिवाय तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.

आधार कार्डाचे महत्व लक्षात घेता, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) कडून नागरिकांना वेळोवेळी महत्त्वाच्या सूचना देण्यात येतात. दरम्यान, नुकतीच UIDAI ने एक नोटीसही जारी केली आहे.

UIDAI ने काय सुचविले?

आधार कार्ड दहा वर्षे जुने असल्यास ते अपडेट करण्याचा सल्ला भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने दिला आहे. UIDAI ने आधार कार्ड धारकांना ओळख, पत्ता आणि इतर संबंधित कागदपत्रे अपडेट करण्यास सांगितले आहे. ज्या व्यक्तींनी दहा वर्षांपूर्वी त्यांचे आधार कार्ड बनवले आहे आणि त्यानंतर या वर्षांत कधीही अपडेट केले नसल्यास अशा आधार कार्ड धारकांना त्यांचा दस्तऐवज अपडेट करण्याची विनंती केली आहे. या दहा वर्षाच्या कालावधी मध्ये आधार कार्ड नंबरच्या आधारे लोकांनी विविध सरकारी योजनांचा फायदा घेतला आहे. UIDAI ने सांगितले की, या योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी लोकांना आधार डेटा मध्ये नव्या वैयक्तिक तपशीलांसह माहिती देणं आवश्यक आहे.

आधार धारक आधार डेटामध्ये वैयक्तिक ओळख पुरावा (Identity Proof) आणि पत्ता पुरावा (Address Proof) संबंधित कागदपत्रे अपडेट करू शकतात. यामुळे आधार प्रमाणीकरण आणि पडताळणीमध्ये कोणतीही गैरसोय होणार नाही.

कसे कराल आधार कार्ड अपडेट

आधार कार्ड ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने अपडेट करता येते. आधार ऑनलाइन अपडेट (Aadhar Online Update) करण्यासाठी तुम्हाला My Aadhaar पोर्टलवर जावे लागेल. दुसरीकडे, आधार कार्डधारक हे आधार केंद्राला भेट देऊन देखील आधार कार्ड अपडेट करू शकतात. यासाठी तुम्हाला काही शुल्कही भरावे लागू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *