दिग्दर्शक महेश मांजेरकर यांनी एका नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे जो शिवचरित्रावर आधारित आहे. मांजेरकर यांच्या आगामी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचा सोहळा मुंबईत नुकताच पार पडला.
या चित्रपटाद्वारे अक्षय कुमार मराठीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटात कोणते कलाकार कोणत्या भूमिका साकारतील, याचीही घोषणा करण्यात आली. महाराजांच्या सात वीरांची ओळख करून देणारे त्यांच्या फर्स्ट लूकचे पोस्टर्सही या वेळी प्रदर्शित करण्यात आले.
अभिनेता दिग्दर्शक प्रविण तरडे या चित्रपटात प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
अभिनेता उत्कर्ष शिंदे सूर्याजी दांडकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
सत्य मांजरेकर दत्ताजी पागे यांची भूमिका साकारणार आहे.
विराट मडके जिवाजी पाटलांच्या भूमिकेत दिसणार आहे.
जय दुधाणे तुळजा जामकर यांची भूमिका साकारणार आहे.
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता हार्दिक जोशी मल्हारी लोखंडे यांच्या भूमिकेत या चित्रपटात झळकणार आहे.
विशाल निकम चंद्राजी कोठार यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
हा चित्रपट २०२३ च्या दिवाळी मध्ये मराठी शिवाय हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.