या फोन मध्ये फोन मध्ये ६.५ इंचाचा HD TFT डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट ६० Hz आहे.
फोनचा बॅक पॅनल स्मूथ फिनिशसह येतो. त्याच्या मागील पॅनलवर ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनेलने त्याला प्रीमियम लुक दिला आहे.
हा फोन ६ जीबी रॅम आणि ८ जीबी रॅम मध्ये उपलब्ध आहे. त्यात १२८ जीबी स्टोरेज दिले गेले आहे, जे मायक्रोएसडी कार्डद्वारे १ टीबी पर्यंत वाढवता येते.
फोनमध्ये दिलेले फिंगरप्रिंट सेन्सरही चांगले काम करते. फोन लगेच अनलॉक होतो.
फोनमध्ये Samsung चा OneUI ३.१ देण्यात आला आहे, जो अँड्रॉइड ११ वर आधारित आहे. कंपनीने दावा केला आहे की त्याला २ वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट दिले जातील.
या फोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी आहे जी १५ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनवर ब्राउझ केले, ओटीटी ऍप्सवर कन्टेन्ट पहिले, ईमेल्स पाठवले, गेमिंग केले, फोटोग्राफी केली तरी एक दिवस चार्जिंग राहील. पण फक्त कॉल किंवा मेसेजसाठी वापरला तर बॅटरी तुम्हाला १.५ दिवसांपेक्षा जास्त काळ सपोर्ट करू शकेल.
या फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा आहे. त्याचा प्राथमिक सेन्सर ४८ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे, ज्याचे अपर्चर १.८ आहे. दुसरा ८ मेगापिक्सलचा सेन्सर आहे, ज्याचा अपर्चर F २.२ आहे. तिसरा ५ मेगापिक्सलचा सेन्सर आहे ज्याचे अपार्चर F २.४ आहे. चौथा सेन्सर २ मेगापिक्सेलचा आहे, ज्याचा अपर्चर F २.४ आहे.
थोडक्यात, फोन डिस्प्ले, कॅमेरा आणि वजन या फीचर्स मध्ये साधारण आहे. पण, फोनमध्ये दिलेली 5G कनेक्टिव्हिटी, फोनची बॅटरी फोनचे प्लस पॉइंट म्हणता येईल.