अमेरिकेच्या इतिहासात 11 सप्टेंबर ही तारीख कुणीही विसरु शकणार नाही. अमेरिकेतील ९/११ च्या दहशतवादी हल्ल्याला आज २१ वर्ष पूर्ण झाली.
11 सप्टेंबरची काळी सकाळ
मंगळवार, 11 सप्टेंबर 2001 रोजी सकाळी, अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याने निर्देशित केलेल्या एकोणीस दहशतवाद्यांनी ईशान्य यूएसहून कॅलिफोर्नियाला जात असलेल्या चार व्यावसायिक विमानांचे अपहरण केले. हल्लेखोरांना पाच सदस्यांच्या तीन गटांमध्ये आणि चार सदस्यांच्या एका गटात संघटित करण्यात आले होते. प्रत्येक गटात विमानाचा ताबा घेणारा एक प्रशिक्षित वैमानिक अपहरणकर्ता होता. त्यांचे उद्दिष्ट अमेरिकेतील प्रमुख इमारतींवर विमाने कोसळवणे, मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि मोठे संरचनात्मक नुकसान करणे हे होते.
चार विमानांचे अपहरण
दहशतवाद्यांनी अमेरिकन ११, युनायटेड ७५, अमेरिकन ७७ आणि युनायटेड ९३ या चार विमानांचे अपहरण केले होते. त्यांनी नॅव्हिगेशन सिस्टम बंद केल्याने विमानाचा थांगपत्ता लागत नव्हता. अशा स्थितीत अमेरिकेतल्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षासमोर विमान नेमके कुठे आहेत हा प्रश्न होता. पण विमानातील प्रवाशांनी संकटाच्या काळी आपल्या आप्तेष्टांना फोन करुन आणि विमानातील एअरक्राफ्ट रेडिओ कम्यूनिकेशन प्रणालीचा वापर करत अधिका-यांना विमान अपहरण झाल्याची माहिती दिली. या संभाषणांवरुन तपास यंत्रणांना विमानात नेमके काय घडले असावे याचा अंदाज बांधणे सोपे झाले.
अपहरणकर्त्यांनी पहिली दोन विमाने न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या उत्तर आणि दक्षिण टॉवर्समध्ये आणि तिसरे विमान व्हर्जिनियाच्या आर्लिंग्टन येथील पेंटागॉनमध्ये यशस्वीरित्या क्रॅश केले. चौथ्या विमानाचा वॉशिंग्टन, डी.सी. येथील एका फेडरल सरकारी इमारतीला [डी] धडक देण्याचा हेतू होता, परंतु त्याऐवजी शँक्सव्हिल, पेनसिल्व्हेनियाच्या बाहेरील एका शेतात कोसळले.
वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या विमान हल्ल्यात तब्बल २,९७७ लोकांचा बळी गेला. हल्ल्यात मारल्या गेलेल्यांमध्ये ५७ देशांच्या नागरिकांचा समावेश होता. या हल्ल्याचा बदला घेत अमेरिकेने 2 मे 2011 रोजी पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये ओसामा बिन लादेनचा खात्मा केला होता.
हे ही वाचा: आंतरराष्ट्रीय शांतता दिन – 21 सप्टेंबर
काय घडले त्या दिवशी…
११ सप्टेंबर २००१ रोजी सकाळी न्यूयॉर्कच्या आकाशातून उडणाऱ्या फ्लाइट-11 मध्ये अजब हालचाल झाली. या विमानात प्रवास करणाऱ्या ९२ जणांना अल कायदाच्या कटाचे आपण शिकार झालो आहोत याबाब कल्पनाच नव्हती. हल्ल्याच्या वेळी वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये जवळपास १८ हजार कर्मचारी काम करत होते. सकाळी ८ वाजून १९ मिनिटांनी ५ दहशतवाद्यांसह ५६ पॅसेंजर्स आणि ९ क्रू मेंबर्स असलेले युनायटेड एअरलाइनसच्या १७५ या विमानाला दहशतवाद्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या साऊथ टॉवरमध्ये घुसवले होते. ट्विन टॉवरमध्ये विमान घुसल्यानंतर इमारतीत आग लागली आणि धुराचे लोट बाहेर येऊ लागले. या दहशतदवादी हल्ल्यांमध्ये २९७७ जणांचा बळी गेला. अमेरिकेवरील या हल्ल्याने संपूर्ण जग हादरले होते. आजही हल्ल्याच्या जखमा ताज्या आहेत.
मदतकार्य
दहशतवादी हल्ल्यानंतर हादरलेल्या आणि भेदरलेल्या अमेरिकेत असंख्य हात मदतीसाठी सरसावले. अंदाजे ९१ हजार जणांनी या वेळी मदतकार्य केले. या दहशतवादी हल्ल्यामध्ये बळी पडलेल्या नागरिकांचे कुटुंबीय, जखमी झालेल्या व्यक्तींना मदत आदी काम या सर्वांनी केले. ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर हेल्थ प्रोग्रॅम’ या नावाने एक विशेष कार्यक्रम सुरू करण्यात आला. भेदरलेल्या मनांना उभारी देण्यासह सर्व नागरिकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देण्यात आले.
मार्च २०२१ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, या कार्यक्रमात ८०,७८५ जणांनी त्यामध्ये सहभाग घेतला. याबाबतचा एक सविस्तर अहवालच प्रसिद्ध झाला आहे. या जबरदस्त दहशतवादी हल्ल्याचा अनुभव घेतलेल्या नागरिकांच्या मनावर त्याचा खोल परिणाम झाला. त्या धक्क्यातून अद्यापही अनेक जण सावरलेले नसल्याचे हा अहवाल सांगतो. शारीरिक व्याधीतून काही जण मुक्त झाले असले, तरीही त्यांनी अद्याप मनाने उभारी घेतलेली नाही.