50 New EV Double Decker Buses in Mumbai: मुंबईत सर्वसामान्य माणसाच्या प्रवासाचं साधन म्हणजे लोकल रेल्वे आणि बेस्ट बसेस. येणाऱ्या नव्या वर्षात बेस्ट बस प्रवाशांना मोठं गिफ्ट देणार आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) या नव्या वर्षात ५० नवीन इलेक्ट्रिक डबल डेकर बस (EV Double Decker Buses in Mumbai) लाँच करणार आहेत. १४ जानेवारीपासून या बस मुंबईच्या रस्त्यावर धावणार असल्याची शक्यता आहे.
अशोक लेलँडची EV उपकंपनी, स्विच मोबिलिटी द्वारे अलीकडेच अनावरण केलेल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसला अनेक राज्य परिवहन उपक्रम (STUs) त्यांच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत तैनात करण्यात आले आहे. स्विच EiV 22, ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर देशभरात चांगली लोकप्रिय होत आहे. मुंबईत पूर्वी बेस्टच्या डबल डेकर बसेस कार्यरत होत्या आणि आता स्विच EiV 22 च्या आगमनानंतर त्या जुन्या आठवणींना परत उजाळा मिळाला. या नवीन डबल डेकर बसेस साठी मुंबईकरांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
EV Double Decker Buses in Mumbai: १४ जानेवारी पासून सेवा
मकर संक्रातीच्या मुहूर्तावर म्हणजेच १४ जानेवारीपासून बेस्ट १० इलेक्ट्रिक बस प्रवाशांसाठी उपलब्ध असणार आहेत. आम्ही सप्टेंबरमध्येच नवीन इलेक्ट्रिक डबल डेकर बस सुरू करण्याचा विचार केला होता. मात्र, ARAIकडून प्रमाणपत्र न आल्याने या योजनेला विलंब झाला, असं बेस्टचे जनरल मॅनेजर लोकेश चंद्रा यांनी म्हटलं आहे.
ई -कॅब सेवा
दरम्यान, बेस्ट इ-कॅब सर्व्हिसही सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. लास्ट- माईल कनेक्टिव्हिडी सुधारण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. ई-कॅबसाठी ऑपरेटर सोधण्यासाठी निविदादेखील काढल्या आहेत. ई-कॅबला बेस्टचा लोगो असेल तर चलो अॅपद्वारे बस प्रवाशांना बुकिंग करता येणार आहे. जून २०२३पर्यंत सुमारे ५०० कॅब सुरू करण्याचा बेस्टचा विचार आहे.
बेस्ट या महिन्यात दर्जेदार बस सुविधा देण्याच्या तयारीत आहे. या नवीन सेवा सुरू करण्यासाठी बेस्टच्या ताफ्यात आणखी बसेसचा समावेश करणार आहे. यामुळं बेस्टच्या नफ्यात येत्या चार ते पाच वर्षांत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
हे ही वाचा: गोव्याच्या नवीन विमानतळाचे 11 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
EV Double Decker Buses in Mumbai: १८ ऑगस्ट रोजी पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस दाखल
देशातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर एसी बस (EV Double Decker Buses in Mumbai) मुंबईत १८ ऑगस्ट रोजी दाखल झाली. स्विच मोबिलिटी लिमिटेड कंपनीने भारतातच ही बस डिझाईन केली आहे तसेच तयार केली आहे. ही बस लेटेस्ट टेक्नोलॉजी, अल्ट्रा मॉडर्न डिझाईन, उत्तम सेफ्टी फीचर्स आणि बेस्ट इन क्लास फीचर्ससह सुसज्ज आहे. यामध्ये एकाच वेळी ६५ प्रवासी बसू शकतात. प्रवाशांच्या सोयीनुसार यात आरामदायक सीट्स देण्यात आल्या आहेत.
EV Double Decker Buses in Mumbai: मुंबईत 200 इलेक्ट्रिक डबल डेकरचा पुरवठा
पहिल्या टप्प्यात, स्विच मोबिलिटी मुंबईत 200 इलेक्ट्रिक डबल डेकरचा पुरवठा, देखभाल आणि संचालन करेल, ज्याचा पुरवठा या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत सुरू होण्याची अपेक्षा आहे. या बसेस 12 वर्षांसाठी GCC कराराचा भाग म्हणून BEST ने ओळखलेल्या मार्गांवर चालवल्या जातील. या इलेक्ट्रिक डबल डेकर्समुळे 86,000 पेक्षा जास्त झाडे लावण्याइतकी 14,000 टन पेक्षा जास्त कार्बन बचत आणि वार्षिक 26 दशलक्ष लिटर डिझेलची इंधन बचत होईल.